Saturday, March 27, 2021

परमात्मा एक मानवधर्मातील सेवकांनी होळी कशाप्रकारे साजरी करावी. यावर विशेष माहिती

         "मानवधर्म" व "होळी"

परमात्मा एक मानवधर्मातील सेवकांनी होळी सण कशाप्रकारे साजरा करावा यावर विशेष माहिती नक्की वाचा.



            परमात्मा एक मानवधर्मातील सेवकांनी 
                होळी कशाप्रकारे साजरी करावी.
                        यावर विशेष माहिती

       आपण मार्गात प्रवेश करतेवेळी परमेश्वराला वचन दिले आहे."भगवान बाबा हनुमानजी मी जिवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले. मी मरिन किंवा जगीन जीवनात एकच परमेश्वराला मानीन" परमेश्वराला दिलेल्या या वचनानुसार आपल्याला मानवधर्मात कुठलाही सण नाही. पण हिंदू धर्म संस्कृतीत राहून समाजात असतांना आपण हिंदू धर्मातील सण आपण आपल्या मानव धर्माच्या नियमात राहून साजरा करू शकतो. ज्याप्रमाणे आपण मानव धर्मातील सेवक दसरा, दिवाळी सण साजरा करतो त्याच प्रमाणे होळी सण सुद्धा आपल्या मानव धर्मातील नियमात राहून साजरा करू शकतो. 

      होळी हा सण आपल्या देशात खुप उत्साहाने साजरा करतात. आपण सुद्धा एकमेकांना रंग लावून होळी या सणाचा आनंद घेत असतो. पण आपल्याला या मानवधर्मा मध्ये दारू आणि दारू पिणाऱ्या व्यक्ती पासुन दूर राहायचे आहे. आणि हा सण पण साजरा करायचा आहे .

     आपण होळी हा सण साजरा करत असतांना रंग 🎨 व पाण्याचा 💧 जास्त प्रमाणात उपयोग करतो. त्यामुळे आपल्याला काहीच फायदा होत नाही. उलट नुकसानच होते. आपण या आधीच्या होळीला पाहिले आहे रंगामुळे आपली स्कीन खराब होते. आणि पाण्याचा दुरुपयोग होते. याच पाण्याची बचत आज केली तर येणारा उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही. म्हणून आपण मानव धर्माचे सेवक जर समाजाला एक प्रेरणा देऊ शकेल याप्रकारे होळी सण साजरा करू शकतो व पाण्याच्या दुरुपयोग टाळू शकतो .

      आपण होळी खेळत असतांना आरडाओरड किंवा डीजे लावून ध्वनीप्रदूषण करत असतो. याच दिवसात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असतात. यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रीत होऊन याकडे आकर्षित होतात. व त्यांचा परिक्षेच्या अभ्यासावर परिणाम होतात. यामुळे त्यांना परिक्षेत कमी गुण मिळाल्याने त्यांचे समोरच भविष्य खराब होतो. म्हणून आपण सेवकांनी जर साध्यासुध्या व शांततेने होळी खेळली तर त्यांचा भविष्यात आपणच काही प्रमाणात प्रेरणादायी बनू शकतो .

         आपल्या मानव धर्मातील सेवकांनी आपल्या परिसरातील, गावातील सेवकांचा घरी जाऊन त्यांना गुलाल लावून होळी सणाच्या शुभेच्छा देऊन होळी हा सण त्यांच्या सोबत साजरा करू शकतो. त्यामुळे ते सेवक सुद्धा अनेकांचा दुर राहतील आणि आपण सुद्धा जवळपास दोन-चार घराचे सेवक असतील तर आपण त्यांच्याशी मानव धर्मावर संवाद साधू शकतो. आणि होळी या सणाचा आनंद ही घेऊ शकतो. 

       आपल्या परिसरात किंवा गावात एक किंवा दोनच घराचे सेवक असतात. आणि आपण अनेका सोबत होळी साजरी करतो म्हटले. तर त्या दिवशी दारू पिणारे असतात. आणि आपल्या दारू पिणाऱ्या पासुन दुर राहायचे आहे. म्हणून सेवकांनी आपल्या जवळच्या सेवकां सोबत होळी साजरी करावी. आणि सेविका ताईंनी सुद्धा आपल्या परिसरातील सेविका ताई सोबत होळी या सणाचा आनंद घ्यावा .

       माझ्या मते होळी या सणाचा दिवशी आपण सेवक आपल्या परिसरातील सेवकांसोबत मिळून मिसळून होळी हा सण साजरा करू शकतो. आणि आपण सर्व एकाच मानव धर्माचे सेवक आहोत तर या होळीच्या दिवशी आपण एकत्र येऊन नविन सेवकांशी ओळख होते. आणि एका भगवंताची चर्चा बैठक घेऊन त्यानंतर एकमेकांना गुलाल लावून अल्पोहार घेऊन एकमेकांना शुभेच्छा देऊ शकतो. आणि होळी हा सण आपण सेवकां सोबत साजरा करू शकतो. कारण माझ्या माहितीप्रमाणे असे भरपूर ठिकाणी होतात. म्हणून आपण सर्वांनी पर्यावरण पूरक व कोरडी होळी साजरी करावी असे मला वाटते .

नमस्कार....!

( टिप:- ही पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )

सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार 
                   ( Social Media Platform)


🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎

             ★ सेवक एकता परिवार ★
             ( Social Media Platform )

©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/


©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1

©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q

©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/

No comments:

Post a Comment

परमात्मा एक मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा.

  "परमात्मा एक" मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा.         !! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!       !! महानत्याग...