Saturday, March 6, 2021

बाबांनी भगवत गुणांचे तीन शब्द दिले आहे.| १) "सत्य बोलने" यावरिल विचार नक्की वाचा व आवडल्यास शेअर करा.

 


        ( बाबांनी भगवत गुणांचे तीन शब्द दिले आहे. )

                             १) "सत्य बोलने"


बघा आजच्या काळात सत्याची खुप गरज आहे. जसे सत्य बोलने, सत्याने वागणे, सत्याचा व्यवहार करणे. सत्य म्हणजे खर आणि आपण फारसे लोकांना बघीतले आहे आणि अनुभवले आहे की जास्तीत जास्त खोटयाचा व्यवहार करतात, बोलतात. आजची परिस्थिती अनुभवली तर प्रत्येक मानव हा आपल्या प्रपंचा करिता, मोठा होण्याकरिता, नावाकरिता खोटयाने वागत आहेत. त्याच्यात मोह, माया व अहंकार आहे. त्यामुळे त्याला सत्याचा ज्ञान नाही. 


▶महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानव धर्मातील सेवकांना सत्याचा परिचय करून दिला आहे. "सत्य ही परमेश्वर है! और परमेश्वर ही सत्य है"! या मानवधर्मात मानव मर्जी चालत नाही तर भगवंत मर्जी चालते. बाबांनी भगवंत गुणांचे तीन शब्द दिले आहेत. सत्य, मर्यादा व प्रेमाने वागणे. म्हणजेच मोह, माया व अहंकाराचा त्याग करून सत्य, मर्यादा व प्रेमाने वागणे. सत्य, मर्यादा व प्रेम भगवंताला आवडणारे गुण आहे. आणि हे गुण मानव धर्मातील प्रत्येक सेवकांचा अंगी असावे. 


▶आपण मानव धर्मातील सेवक असुन आपल्याला अनेकांच्या समाजात वावरत असतांना काही अनेकातील लोक आपल्याला आजमावून पाहतात. जसे विनाकारण आपल्याशी भांडण करतील, तर कधी खोटा व्यवहार करतील, तर काही खोट बोलणार व आपली फसवणूक करण्याचा प्रयत्न करतील पण आपले एक चित्त, एक लक्ष भगवंता कडे पाहिजे व तत्व, शब्दाचे तंतोतंत पालन केले तर आपल्याला कोणीही काहीही करू शकणार नाही. आणि सत्याने जो वागेल त्याचा पायाला काटा ही रूतणार नाही ही या मार्गाची ग्वाही आहे. प्रत्येक सेवकांना आज अनुभव आहे की अनेक वाले आपल्याशी खोटा व्यवहार करून पाहतात पण आपण डगमगु नये .


▶एक म्हण आहे. शब्द ही भगवान है! शब्द ही शैतान है! याकरिता आपल्या मानव धर्मातील सेवकांनी आपल्या कुटुंबात व सेवकात शब्द सांभाळून बोलावे. प्रत्येक शब्द हा सत्याचा असावा. सत्याने बोललेल्या शब्दाचा परिणाम समोरच्या व्यक्तीवर औषधीचे काम करतो. तोच शब्द खोटा, असत्याचा असेल तर समोरच्या व्यक्तीवर घाव करतो कारण तो सैतानाचा शब्द होतो. म्हणूनच म्हटले आहे की एक शब्द करे औषध, एक शब्द करे घाव. बोलतांना शब्दाचा प्रयोग हा सत्याचा असावा. आपल्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हा आत्म्यातुन निघतो. आणि तो शब्द दुसर्या आत्म्याचा अपमान होणार नाही अश्या शब्दाचा वापर करावा. बाबांनी प्रत्येक आत्म्यात परमात्मा दाखविला आहे. याकरिता नेहमी सत्याचीच बाजू मांडावी. सत्यानेच बोलावेत. 



माझ्या लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो .


नमस्कार...!


( टिप:- ही पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )


सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार 

                   ( Social Media Platform)



🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎


             ★ सेवक एकता परिवार ★

             ( Social Media Platform )


©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )

https://www.facebook.com/SevakEktaParivar/



©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )

https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1


©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )

https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q


©️ सेवक एकता परिवार ( Instagram )

https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/

No comments:

Post a Comment

परमात्मा एक मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा.

  "परमात्मा एक" मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा.         !! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!       !! महानत्याग...