!! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!
!! महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !!
!! परमात्मा एक !!
भारतीय संस्कृतीमध्ये मानवाला परमेश्वराबद्दल जागविण्याकरिता अनेक महापरूषांनी जन्म घेतला. ही सृष्टी सदोदित सत्य मानवाची राहावी म्हणून परमेश्वराने कालचक्र निर्माण केले. या कालचक्रात सत्ययुग, द्वापार युग, त्रेतायुग आणि कलीयुग अशी चार युगांची रचना केली. या सर्व युगामध्ये जेव्हा जेव्हा अराजकता, अनिती, अनैतिकता, असत्य, दुराचार, अत्याचार, भ्रष्टाचार, स्वार्थीपणा, मोह, माया, अहंकार या वृत्ती मानवांत भयंकर प्रमाणात वाढु लागल्या तेव्हा तेव्हा परमेश्वराने या गोष्टीचा नायनाट करण्याकरिता मानवाच्या रूपात जन्म घेतला आणि त्या गोष्टीबद्दल मानवांत जागृती निर्माण करून त्याचा नाश केला. इतकेच नव्हे तर मानवाला परमेश्वरी गुणांबद्दल जागविले आणि मानवाला मोक्ष कसा मिळेल याबद्दल त्यांनी शिकवण दिली. थोडक्यात आध्यात्मिक शक्ती, नीती, सत्य, आत्माच्या दृष्टीने अवलंबिले. धर्मनीती हीच खरी परमेश्वरी कृपा आहे हे शिकविण्याचे कार्य या महापुरूषांकडून घडविले. अशाप्रकारे प्रत्येक युगात कालपरत्वे सत्यनिती टिकविण्यासाठी परमेश्वराचा अंश म्हणून महापुरूषांच्या रूपात परमेश्वराचा जन्म झालेला आहे.
अशा एका निष्काम कार्य करण्याऱ्या कर्मयोगी महान त्यागी बाबा जुमदेवजी महापुरूषाचा महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर शहरातील गोळीबार चौक जवळील टिमकी या परिसरात वास्तव्यास असलेल्या श्री. विठोबाजी राखडू ठुब्रिकर आणि सौ.सरस्वतीबाई या दांपत्याच्या पोटी ३ एप्रिल १९२१ रोजी जन्माला आले.
त्यांनी २५ ऑगष्ट १९४८ सृष्टीनिर्मात्या एका भगवंताची प्राप्ती केली आणि त्या परमेश्वरी कृपेचा परीचय समाजातील सर्व दुःखी कष्टी, गोरगरीब, जनतेला विनामुल्य करून दिला. त्यांनी परमेश्वराची ओळख करून देताना सांगितले कि, परमेश्वर हा एकच आहे व तो प्रत्येकात विराजमान आहे. तो निराकार आहे. ती व्यक्ती नसून जागृत शक्ती आहे. तो मानवता चोविस तास चैतन्य आहे. ती निर्जिव वस्तुमध्ये नसून सजीव प्राण्यांच्या आत्मात आहे. परमेश्वर दिसत नसून त्याचे गुण दिसतात. मानवाने परमेश्वराला प्रिय असणारे सत्य, मर्यादा, प्रेमाचे आचरण करावे, त्यागाने कार्य घडवावे म्हणजे खरा मोक्ष मिळतो. "मानवाने मानवासारखे वागावे, सत्य यही भगवान है" ही शिकवण त्यांनी दिली. अशाप्रकारे मानवाला परमेश्वराबद्दल जागविण्याकरिता त्यांनी १९४९ साली फेब्रुवारी महिन्यात "मानव धर्माची' स्थापना केली.
परमेश्वराला हव्या असलेल्या सत्य, मर्यादा, आणि प्रेमपूर्ण वागणूक यासाठी मानवाला कार्य करायचे आहेत, मर्यादित कुटुंब, वाईट व्यसनमुक्ती, शुध्द मन, स्वच्छ कपडे, साधी राहणी, उदात्त विचार आणि त्यागमय जीवन इ. गोष्टी या मानव धर्माची शिकवण आहे.
या मानव धर्माची स्थापना केल्यानंतर महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी दुःखी कष्टी मानवाला एका भगवंताचा परिचय करून देण्याकरिता खेडोपाडी, बैलगाडीने, पाई दौरा करून कशाचीही पर्वा न करता मानवजागृतीचे कार्य निष्काम भावनेने केले. बाबांनी भगवत प्राप्ती करिता निष्काम कर्म योग साधण्याकरिता बाबांनी चार तत्व दिले व आपली घरगृहस्थी उंच आणण्याकरिता पाच नियम दिले व सेवकात व कुटूंबात एकता कायम राहावी याकरिता तीन शब्द दिले. या चार तत्व, तीन शब्द व पाच नियमाचा आधारावर मार्गात येणारा सेवक आपले जिवन सुखमय जगु शकतो. बाबांनी सृष्टी निर्मात्या एका परमेश्वराची कृपा संपादन करून सुध्दा कधीही कोणालाही आपल्या पाया पडू दिले नाही किंवा कोणाकडून एक पैसा किंवा कुठलीही भेटवस्तु स्विकारली नाही तर त्यांनी निष्काम भावनेने लोकांची सेवा केली. कारण 'मानवाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा' असे त्यांचे मानने होते. बाबांनी प्राणातप्राण असेपर्यन्त सत्य, मर्यादा प्रेमाचे आचरण करून तिच शिक्षा आपल्या सेवकांना दिली.
महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी केलेल्या महान कार्याचीद खल घेवून भारत सरकारने त्यांच्या नावे दि. ३०/९/२०१३ ला 'टपाल खात्याचे टिकीट' काढून त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी स्थापन केलेल्या 'परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूर' ला महाराष्ट्र शासनातर्फे 'महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार' बहाल करण्यात आला.
अशा प्रकारे निष्काम कर्मयोगी महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी दु:खी कष्टी गोर-गरिब मानवाला जगविण्याचे एका भगवंताच्या मानवाला परिचय करून देण्याचे कार्य सुरू केले होते. तेच कार्य बाबांनी मानव धर्माचे प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने ४ डिसेंबर १९६९ ला परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळाची स्थापना केली. मंडळाचे कार्य अहोरात्र सुरू असून बाबांचा संदेश, उपदेश दुःखी, कष्टी व गोरगरीब जनतेपर्यनत पोहचवून त्यांना सत्याप्रती जागवून महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी सुरू केलेल्या सत्ययुगाचा रथ पुढे नेत आहेत.
अशा या कलियुगात सत्याचे बीज पेरणारे, सत्य मर्यादा प्रेमाचे जनक, मानवधर्म व परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक, निष्काम कर्मयोगी भारताचे आदर्श महामानव, थोर समाज सुधारक "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांचा दरवर्षी ३ एप्रिल ला जन्मोत्सव निमित्त परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर च्या वतीने टिमकीतुन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ ( मानव मंदिर ) पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येते. आणि मानवधर्मावर आधारित चर्चा सत्र आयोजित करण्यात येते. या शोभायात्रेत लाखोंच्या संख्येने सेवक-सेविका गावोगावुन, शहरातुन, राज्यातुन येऊन शोभायात्रेत सहभागी होतात. व चर्चासत्रेचा लाभ घेतात. अशा प्रकारे "महानत्यागी बाबा जुमदेवजींचा" जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने या महामानवाला कोटी कोटी प्रणाम!
। भगवान बाबा हनुमानजी की जय।
।। महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय ।।
।।। परमात्मा एक ।।।
सत्य, मर्यादा व प्रेम कायम करनेवाले
अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले
मानव धर्म की जय ।
माझ्या लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार....!
( टिप:- ही पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )
सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार
( Social Media Platform)
🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎
★ सेवक एकता परिवार ★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/
🙏जी दादा छान विचार दिले
ReplyDelete