( "बाबांनी भगवत गुणांचे तीन शब्द दिले आहे." )
२) "मर्यादा पाळने"
"मर्यादा" ही आपल्या जीवनाचा एक भाग आहे. मर्यादा बोलण्यात पाहिजे. वागण्यात पाहिजे. आपण मानवधर्माचे सेवक असुन आपल्याला आपल्या कुटुंबात व सेवकात मर्यादेत राहून बोलणे, वागणे पाहिजे. आपल्या पेक्षा लहान असो किंवा मोठा असो समोरच्या व्यक्तीचा मान ठेवून सन्मान करून मर्यादित बोलले पाहिजे. एक म्हण आहे. "जैसा दोगे, वैसा पाओगे" या म्हणी प्रमाने आपण समोरच्या व्यक्तीला मान देऊन मर्यादित बोलले तर तोही आपल्याशी मानाने बोलणार. लहान तोंडी मोठा घास घेऊ नये.
आपल्याशी कोणी भांडण ही करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या निंदा ही करत राहिले तरी सुद्धा आपण मानवधर्माचे सेवक आहोत ह्याचा भान ठेवून त्यांच्याशी मर्यादित व मानानेच बोलावले. तोही एक दिवस शांत राहिल. आपल्या वडिलधारी लोकांचा मान ठेवावे. आपल्या कुटुंबात मर्यादित बोलावे. सेवकात सुद्धा मर्यादित राहून बोलावे.
आपल्या मुखातून निघालेला शब्द हा आपल्या मनातून निघालेल्या शब्दाचा दुसर्याच्या मनावर वाईट परिणाम किंवा त्यांचे मन दुखावणार नाही असा शब्द बोलू नये. शब्द मर्यादित असावा. "शब्दाला नाही हात - पाय, एक शब्द करे घाव, एक शब्द करे औषध" या म्हणी प्रमाने आपल्या शब्दावर नियंत्रण ठेवून मर्यादित राहून आपल्या शब्दाचा चांगला वापर करावा. जीवन जगत असतांना आपल्याला भरपूर असे उदाहरण देता येईल ज्यामुळे आपली मर्यादा राहत नाही. आपल्या परिवारात पुष्कळ गोष्टींची मर्यादा आहेत. की ज्यांचा आपण कधी विचार ही करत नाही.
बाबांनी याच गोष्टीचा विचार करुन भगवंत गुणांचे तीन शब्द दिले असावेत. कारण या तीनही शब्द भगवंताला आवडणारे आहे परमेश्वराला प्रिय असणारे शब्द बाबांनी आपल्याला पाळायला दिले आहे. त्यामुळेच आज आपण सुखी - समाधानी आहोत. परंतु आजच्या परिस्थितीत काही गोष्टींची मर्यादा आजही आपल्यात नाही. त्यामुळे सेवकात एकता दिसुन येत नाही. स्व मर्जीने वागतात स्व मर्जीचे कार्य करतात. कुणाचाही मान न ठेवता चुकिचे कर्म करतात. बाबांचा शिकवणीला विसर पडत आहे. यात किती मोठ्या प्रमाणात मर्यादेचे पालन होत नाही हे त्यांचा लक्षात अजुनही येत नाही. बाबांचे शब्द आहे. "जो जागेगा वो पायेगा, जो सोयेगा वो खोयेगा" एक त्यांनाही सत्य, मर्यादा व प्रेम कळेल. याकरिता सत्याला जागा, मर्यादेला पाळा व प्रेमाने वागा.
माझा लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार...!
( टिप:- ही पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )
सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार
( Social Media Platform)
🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎
★ सेवक एकता परिवार ★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/
No comments:
Post a Comment