[ "परमात्मा एक मानवधर्म" ]
[ "अनुभव सागर" ]
माझे नाव आशिष गंभीरजी भोयर आहे.आज मी माझे अनुभव मार्गात येण्याचे कारण सांगत आहे .
मी अनेकात असताना आमच्या वरती अनेक प्रकारचे दु:ख येत होते. मी हवन कार्यात जात होतो. आणि हवन कार्यातुन घरी आलोकी मी आई बाबाला म्हणत जायचा की आपण परमात्मा एक चा मार्ग घेऊन काय तर आई बाबा म्हणायचे आपन घरात मोठे आहे आणी आपन मार्गात नाही यऊ असे मनत होतो.
माझी आई काही दिवसांनी मरण पावली तेव्हा माझ्या मीञाची आई मला नेहमी म्हणत असे की तुम्ही मार्गात येऊन जा माझे आईचा मृत्यू साप चावल्याने झाला तो दिवस राखीचा होता. मग मी कंपनीत कामाला लागलो दोन तीन वर्ष चांगले गेले आणी नंतर मी बीमार झालो डॉक्टर नी सागीतल तुला डेगु मलेरिया आणी काविड झाले विस पंचवीस हजार रुपये खर्च झाले. डॉक्टरांनी ब्लड टेस्ट नॉरमल सांगीतली मी तेव्हा भगवंताला शब्द दिला हे भगवान तु मला मार नाहीतर मला मार्गात आन तेव्हा पन एक आठवडा असाच गेला नंतर मला तसच वाटायच मग मी आनखी माझ्या बाबाला म्हटल की आपन मार्गात येऊन काय तर बाबा हो म्हणाले.
मग माझ्या घराचा मागे पक्कीचे सेवक राहत होते. त्यांना विचारपुस केले आणी तेव्हा आम्हाला राऊत गुरूजी कडे नेण्यात आले. काकाजी नी आम्हाला मार्गात मरावे लागते असे म्हटले तेव्हा आम्ही मरायला तयार आहे. मग काकाजीने आम्हाला घरची साफसफाई करायला सांगितले मग आम्ही काकाजीच्या घरून नीगालो आणि मला दिघोरीत ऊलटी झाली आणि मला बर वाटायला लागल मग काकाजीनी आम्हाला तिन दिवसाचे कार्य दीले मग मी कामाला गेलो मला लूस्त पणा वाटत होती मग कसातरी घरी आलो आणी माझ्या घरी एक सेवकीन बसुन होती तिने मला विचारल काय झालंय म्हणुन मग तिने आपल्या मुलाला बोलावुन तीर्थ करून दिले आणि तेव्हापासुन मी आज पर्यत दवाखान्यात ग़ेलो नाही. आता सर्व सुख समाधानी आहे.
लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना श्रमा मागतो.
नमस्कार ...!
माझे नाव :- आशीष गंभीरजी भोयर
पत्ता :- रा, मोहाडी (कुचाडी)
माझे मार्गदर्शक :- मारोतरावजी राऊत (गुरूजी)
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर
( टिप :- वरिल पोस्ट कोणीही कॉपी करू नये. त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावे. )
सोशल मीडिया प्रकाशन:- सेवक एकता परिवार
( Facebook Page )
🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎
. ★ सेवक एकता परिवार ★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/
No comments:
Post a Comment