Saturday, February 20, 2021

"चार तत्त्व" | ३) "दुःख दारी दुर करते हुये उद्धार" यावरिल विचार नक्की वाचा व आवडल्यास शेअर करा.

 


      महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती करत असतांना बाबांनी  परमेश्वराला दोन शब्दाचे वचन दिले "परमात्मा एक", "मरे या जिये भगवत नाम पर" यावर भगवंत बाबांवर प्रसन्न होऊन बाबांना दोन शब्दाचे वचन दिले "दुःख दारी दुर करते हुये उद्धार", "इच्छा अनुसार भोजन" हे या मार्गाचे तत्व आहे. तेव्हा पासून बाबांनी सर्व पुजा बंद करून एकच भगवंताला मानुन एकाच भगवंताचे कार्य केले आणि सर्वांना आदेश दिला. सर्व जुनी पुजा बंद करून एकाच भगवंताला मानायचे. बाबांनी दिलेल्या वचनाचे आणि भगवंताने बाबांना दिलेल्या वचनाचे बाबांनी चार तत्व जिवनात पालन करायला सांगितले. या मार्गातला सेवक चार तत्त्वाचे पालन करेल तो कधीही दुःखी आणि गरिब राहणार नाही. ज्या प्रमाणे बाबांनी भगवंताला वचन दिले आणि भगवंताने बाबांना २४ तास चैतन्य मय शक्तीचा परिचय करून दिला. त्याच प्रमाणे या मार्गावर येणाऱ्या सेवकाला सुद्धा भगवंताला वचन देऊन आपले दुःख दुर करता येते. आणि बाबांनी दिलेल्या चार तत्त्वाचे आपल्या जिवनात तंतोतंत पालन करावे लागेल. तरच भगवंताची २४ तास चैतन्य मय शक्तीचा अनुभव सेवकाला मिळेल. आणि दुःख दुर होऊन तो सुखी समाधानी होईल.


      मानवाने परमेश्वराला प्रिय असणारे तीन गुण सत्य, मर्यादा व प्रेम नेहमी आचरणात आणले आणि परमेश्वराला प्रिय असणारे कार्य केले तर परमेश्वर कधीही आपल्याला काहीच कमी पडू देत नाही. मोह, माया व अहंकाराचा त्याग केला सर्वांशी सत्याने व्यवहार केला , मर्यादेने वागलो आणि प्रेमाचे आचरण केले. तर तो मानव परमेश्वराला नेहमी प्रिय असतो. जीवन जगत असतांना प्राकृतिक वातावरणामुळे मानवी शरीरावर दुःख येतात.  अनेक प्रकारच्या अडचणी येतात. त्या वेळी अनेक उपचार करतो. त्यावेळी परमेश्वराला समोर ठेवून उपचार केले तर त्याचे दुःख लवकर नष्ट होते. आणि त्याच्या अडी अडचणी दुर होतात. परमेश्वराला समोर ठेवून केलेल्या कामात  परमेश्वर नेहमी साथ देतो.  शेवटी मानवाला परमेश्वर मुक्ती देतो. व त्याला मोक्ष प्राप्त होतो.  मानवाला परमेश्वराचा चरणी स्थान मिळते. याप्रकारे परमेश्वर मानवाचे दुःख दूर करून शेवटी त्याचा जीवनाचा उद्धार करतो.


लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.


नमस्कार...!



( टिप:- ही पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )


सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार 

                   ( Social Media Platform)



🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎


             ★ सेवक एकता परिवार ★

             ( Social Media Platform )


©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )

https://www.facebook.com/SevakEktaParivar/



©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )

https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1


©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )

https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q


©️ सेवक एकता परिवार ( Instagram )

https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/

No comments:

Post a Comment

परमात्मा एक मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा.

  "परमात्मा एक" मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा.         !! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!       !! महानत्याग...