मार्गात येण्या आधी आपण कुठल्या ना कुठल्या दुःखामुळे त्रासलो होतो. कुणी शारीरिक तर कुणी मानसिक त्रासा मुळे तर कुणी वाईट व्यसनाने तर कुणी भुतबाधा व अंधश्रध्दा मुळे त्रासलो होतो. दुःख एवढे होते की आपण मरण्याचा वाटेला जात होतो. घरची परिस्थिती एवढी खराब आणि हालावली होती की खायला अन्न सुद्धा मिळत नव्हते. आणि दुःखा पासून आराम मिळावा याकरिता इकडे तिकडे धडपड करत होतो. तेव्हा आपल्याला कुणीही साथ देत नव्हते आणि आपल्याला मदतही करत नव्हते.
आपण त्यावेळी अनेकात असल्यामुळे अनेकांना मानत होतो. आणि अनेक पुजापाठ करत होतो. दुःखामुळे अंधश्रद्धेचा मागे वळून वाट्टेल ते चुकिचे कर्म केले. तेव्हा आपल्याला आपल्या दुःखामुळे अनेकाने पैश्यांने लुटले. सांगेल त्याप्रमाणे वागत गेलो आणि आपले कर्म चुकत गेले. आपण अनेकांना पुजत गेलो. पण कुणीही आपले दुःख दुर केले नाही. तेव्हा एकच परमेश्वर कृपेचा मार्ग मिळाला. "परमात्मा एक" या मार्गावर असलेल्या सेवकांनी आपल्याला या मार्गाची माहिती दिली. आणि आपण या मार्गावर येण्याचा विचार करून मार्ग स्वीकारला. आणि मार्गात येताच आपले मोठ्यात मोठे, असाध्य रोग, दुःख एका श्रणात दुर झाले. तर त्या परमेश्वराची महान कृपा आणि जागृत शक्ती२४ तास चैतन्य मय शक्तीचा आपल्याला अनुभव मिळाला आणि आपण सुखी, समाधानी झालो. अशी महान कृपा प्राप्त करणारे आपल्या सर्व सेवकांचे सदगुर मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती करून आम्हा दुःखी कष्टी मानवाला या मार्गाचा परिचय करून दिला आणि आपले दुःख दुर केले. बाबांनी आपल्याला चार तत्व, तीन शब्द व पाच नियमाचे पालन करायला सांगितले आहे. या तत्व, शब्द व नियमाचे तंतोतंत पालन केल्याने आणि परमेश्वरावर विश्वास केल्याने आपले दुःख एका श्रणात शब्दावर परमेश्वर योग देऊन आपले दुःख दुर करतो.
महानत्यागी बाबा जुमदेवजी एका परमेश्वराची प्राप्ती करत असताना परमेश्वराने बाबाला दर्शन दिले. परमेश्वराला निष्काम भावनेने मानवाला परमेश्वर प्रती जगविण्यासाठी कार्य करील असे वचन देऊन "परमात्मा एक" व "मरे या जिये भगवत नाम पर" हे वचन दिले व यावर परमेश्वर बाबांवर प्रसन्न होऊन बाबांना दोन वचन दिले "दुःख दारी दुर करते हुये उद्धार" व इच्छा अनुसार भोजन" हेच वचन या मार्गाचे तत्व आहे. सर्व सेवकांना पण मार्गात येतांना वचनबद्ध केले आहे आणि रोज आपण भगवंताला वचन देतो. त्यावरच भगवत कृपा उपस्थित राहुन आपले कार्य घडवते. बाबांनी आत्म्यात "परमात्मा" दाखविला आहे म्हणून प्रत्येक आत्म्याचा आदर करायला सांगितले आहे. आपल्या कुटुंबात व सेवकात एकता कायम करायला सांगितले आहे. बाबांनी दिलेल्या चार तत्वात पहिला तत्व "परमात्मा एक" येतो आणि याचेच पालन आपल्याला आपल्या जिवनात रोज करायचे आहे. परमात्मा एक प्रत्येक आत्म्यात आहे त्यामुळे सर्वांचा आदर करून सत्य, मर्यादा व प्रेमाचे आचरण करून सर्वांशी आपले कार्य करावे. तरच परमात्मा आपल्या आत्म्यात २४ तास चैतन्य मय राहिल. आणि आपले कर्म योग्य राहिल.
महानत्यागी बाबा जुमदेवजींनी अशा एका परमेश्वराचा शोध घेतला जी मानवाचे सर्व प्रकारची दुःखे दुर करू शकते. तेव्हा परमेश्वराने आकारात येऊन दर्शन दिले. 'तुज आहे तुजपाशी तरी तू भुललासी' या म्हणीप्रमाणे ते बाबांना म्हणाले, सेवक तू मुझे कहाँ देख रहा है। मै २४ घंटे तेरे पास हूँ। जिस पल छूट जाऊंगा, तेरा शरीर मृत हो जायेगा । तेव्हा बाबांनी विचार केला की, अशी कोणती वस्तू आहे ज्यामुळे मी जीवंत आहे. तेव्हा त्यांना 'आत्मा' ही वस्तू आठवली. मनुष्याचा आत्मा निघून गेल्यावर त्याचे शरीर मृत होते. शरीर हे नश्वर आहे. आत्मा हा अमर असून तो परमेश्वराचा अंश आहे. संपूर्ण प्राण्यांचा आत्मा मिळून एक परमात्मा' आहे. म्हणजेच परमात्म्याचा अंश प्रत्येक जीवात्म्यात आहे. हे बाबांनी ओळखले. म्हणून बाबांनी परमेश्वराला ‘परमात्मा एक' मानले ती आत्मज्योत आहे. जो आत्मा बाबांजवळ आहे तोच आत्मा इतरांजवळ आहे. म्हणजेच सर्व मानव समान आहेत असे बाबा समजतात. त्यामुळे ते कोणालाही आपल्या पायावर डोके ठेवू देत नाहीत. कारण एका आत्म्याच्या समोर दुसरा आत्मा झुकणे हा आत्म्याचा अनादर होतो म्हणजेच परमेश्वराचा अनादर होतो. आत्मा चोवीस तास चैतन्य मय शक्ती आहे. ती शक्ती दिसत नसुन तिचे गुण दिसतात.
लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना श्रमा मागतो.
नमस्कार...!
( टिप:- पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )
सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार
( Social Media Platform)
🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎
★ सेवक एकता परिवार ★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/
No comments:
Post a Comment