Saturday, February 27, 2021

"चार तत्व" | ४) "इच्छा अनुसार भोजन" यावरिल विचार नक्की वाचा व आवडल्यास शेअर करा.

 


      मानव जन्माला आला की सुखी जीवन जगण्यासाठी बरेच गोष्टींची आवश्यकता असते. आणि आपले जीवन सुखी समाधानी कसे होईल याकडे जास्त लक्ष असते. तेव्हा आपण भगवंताकडे आपल्याला पाहिजे असलेल्या वस्तुंची इच्छा केली असता भगवंत ती वस्तूची सहजरीत्या देतो.  हेच इच्छा अनुसार भोजन आहे. इच्छा अनुसार भोजन याचा अर्थ असा नाही की आज आपण आपल्या इच्छेनुसार भोजन करायचे.  आपण भगवंताला केलेली इच्छा तो भगवंत योग देतो आणि आपल्या इच्छेनुसार आपल्याला फळ देतो. यालाच इच्छा अनुसार भोजन असा याचा अर्थ आहे. 

   

         इच्छा अनुसार भोजन याचे बरेच उदाहरण भगवत कार्याने निघतात. आपण भगवंताला एखाद्या दुःखा मुळे, काही अपेक्षा पूर्ण होण्याकरिता, आपल्या कामात, परिवारात अशा अनेक इच्छा भगवंताला विनंती केली असता भगवंत योग देऊन आपल्या इच्छा पूर्ण करतात. 

 

        इच्छा अनुसार भोजन या तत्वाचा खरा अर्थ महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका सेवकांचा अनुभवातून दिला आहे. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा "मोगरकसा" जवळ "मंगरली"या  गावी दौरा होता. बाबा सोबत बरेच सेवक होते. तेव्हा त्यांना एक दिवस रात्र झाली असता. सेवकांनी बाबांना चहा घेऊ अशी विनंती केली व ज्या सेवकांकडे बाबा थांबले तो सेवक गवळी होता. तेव्हा सेवकांनी बाबांना म्हटले बाबा दुधाचा चहा पिऊ या तेव्हा बाबांनी त्या गवळी सेवकाला म्हटले. आज हमे दुध की चाय चाहिए. तेव्हा तो सेवक म्हणला बाबा एवढ्या रात्री दुध कुठून आणू. तेव्हा बाबा म्हणाले आज हमे दुध की चाय चाहिये. बाबांनी म्हटले ज्या म्हशीने एकही थेंब दुध दिले नाही त्या म्हशीला समोर आण आणि भगवंताला अगरबत्ती लावून कापूर लाव आणि विनंती कर भगवान बाबा हनुमानजी महानत्यागी बाबा जुमदेवजी को दुध की चाय चाहिए. तेव्हा त्या म्हशीने दोन लिटर दुध दिले. आणि बाबा म्हणाले या दुधात एकही थेंब पाणी टाकू नका आणि एकही थेंब दुध वाचुन नका पूर्ण दुधाचा चहा करा. तेव्हा तो सेवक बाबांना म्हणाला बाबा आणखी एक म्हशी दुध देईल का. तेव्हा बाबा म्हणाले त्या सेवकाला तुझा भगवंतावर पूर्ण विश्वास असेल तर देईल. परमेश्वराने माझी इच्छा पूर्ण केली. मला माझ्या इच्छेनुसार मिळाले. भगवंताला आवडणारे गुण तुझ्या जवळ असेल तर तुलाही मिळेल. यावरून हेच सिद्ध होते की परमेश्वराला केलेली विनंती ही परमेश्वराला आवडणारे गुण आपल्या अंगी असायला पाहिजे आणि भगवंतावर पूर्ण विश्वास असायला पाहिजे. तर परमेश्वर आपल्या इच्छेनुसार आपल्याला फळ तेव्हाच देतो. 

   बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द व नियमाचे आपल्या जिवनात तंतोतंत पालन करावे लागेल आणि भगवंताला केलेली विनंती भगवंत योग देतो. म्हणजेच आपल्या इच्छेनुसार भोजन देतो. याचाच अर्थ इच्छा अनुसार भोजन असा होतो. 


माझ्या लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.


नमस्कार...!


( टिप:- ही पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )


सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार 

                   ( Social Media Platform)



🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎


             ★ सेवक एकता परिवार ★

             ( Social Media Platform )


©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )

https://www.facebook.com/SevakEktaParivar/



©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )

https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1


©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )

https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q


©️ सेवक एकता परिवार ( Instagram )

https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/

No comments:

Post a Comment

परमात्मा एक मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा.

  "परमात्मा एक" मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा.         !! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!       !! महानत्याग...