महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती करिता खुप परिश्रम केले. बाबांनी भगवंताला प्राप्त करण्याकरिता विधी मांडली व एका परमेश्वराला प्राप्त करत असतांना बाबा विदेह अवस्थेत असतांना बाबांना भगवंतांनी बाबाला दर्शन दिले. तेव्हा भगवंताने बाबाला बेइमान म्हटले. "सेवक मै भगवान हूँ तू मानव है। मानव यह बेइमान है। उसमेसे तू एक मानव हैं। भलेही तुने मुझे प्राप्त किया। मैं भगवान हूं। मै मानव पर कदापि विश्वास नहीं करता"। त्यानंतर बाबांनी परमेश्वराला इमानदारी व निष्काम भावनेने या धरतीवरील दुःखी - कष्टी मानवाला परमेश्वरी कृपेकरिता जगविणयाचे कार्य करिन असे वचन दिले. आणि "परमात्मा एक", "मरे या जिये भगवत नाम पर" असे भगवंताला वचन दिले. त्यानंतर भगवंत बाबांवर प्रसन्न होऊन बाबांना दोन वचन दिले. "दुःख दारी दुर करते हुये उद्धार", व "इच्छा अनुसार भोजन" हेच वचन या मार्गाचे तत्व आहे. बाबांनी भगवत प्राप्ती करिता निष्काम कर्म योग साधण्याकरिता आणि मानवी जीवनात सफल होण्याकरिता बाबांनी चार तत्व दिले आहे. "परमात्मा एक", "मरे या जिये भगवत नाम पर", दुःख दारी दुर करते हुए उद्धार", "इच्छा अनुसार भोजन" असे चार तत्व बाबांनी सर्वांना आपल्या जिवनात पाळायला दिले आहे.
मानव हा जन्माला आला की तो आपल्या अल्प बुद्धि नुसार कार्य करतो परमेश्वराची ओळख नसते. मोह, माया, अहंकार त्या मानवाचा अंगी वाढत असतो. त्याला परमेश्वराचा ज्ञान नसतो. तो स्वतःला मोठा समजुन आपले चुकिचे कर्म करत असतो. तो आपल्या अहंकारात आपले चुकिचे कर्म करत राहतो. आणि त्याच वाईट कर्मात तो फसतो. आणि दुःखास पात्र होतो. आणि मग नाही ते उपचार करतो. आपण सुद्धा मार्गात येण्याआधी दुःखा मुळे कितीतरी नानाप्रकारचे उपचार केले. पण कुठेही समाधानी मिळाली नाही. शेवटी एकाच परमेश्वराचा मार्ग मिळतो आणि त्याच परमेश्वराला आराधना करतो. आणि मानवधर्म मार्गात येतो. बाबांनी प्रत्येक आत्म्यात परमात्मा दाखविला आहे. जिवन जगे पर्यंत परमेश्वराला मानावे लागते. मरन आले की शरीर मृत होऊन परमेश्वरात विलीन होतो. म्हणून आपण ज्यावेळी मार्गात येतो तेव्हा परमेश्वराला वचन देतो "मी मरिन किंवा जगिन जिवनात एकच भगवान बाबा हनुमानजीलाच मानिन". म्हणजेच "मरे या जिये भगवत नाम पर" आपले शरीर मृत होत पर्यंत आपल्याला भगवत कार्य करायचे आहे. आपल्या शरीरात जो आत्मा आहे तो परमेश्वराचा अंश आहे. परमेश्वराला समोर ठेवून आपले कार्य करत राहाले तर आपल्या मनातील मोह, माया, अहंकार नष्ट होतात. आणि परमेश्वराला दिलेला वचन जीवनात कधीही विसरू नये. आणि बाबांनी दिलेले चार तत्व, तीन शब्द व पाच नियम जिवनात रोज आपल्या आचरणात आणावे. तरच आपल्या अंगी असलेल्या मोह, माया व अहंकाराचा नाश होणार. आणि तत्व, शब्द व नियमाने वागले तर वाईट विचार नष्ट होतात. यालाच "मरे या जिये भगवत नाम पर" म्हटले आहे.
माझ्या लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना श्रमा मागतो.
नमस्कार..!
( टिप:- हि पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )
सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार
( Social Media Platform)
🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎
★ सेवक एकता परिवार ★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/
No comments:
Post a Comment