"परमेश्वर" म्हणजे काय?
"परमेश्वर" कशात आहे.
हे "महानत्यागी बाबा जुमदेवजींनी" कशाप्रकारे सिद्ध करुन दिले.
ही माहिती नक्की वाचा व जास्तीत जास्त सेवकांपर्यंत शेअर करा.
परमेश्वर म्हणजे श्रद्धा, परमेश्वर म्हणजे विश्वास सर्व सजीव प्राण्यांच्या आत्म्यामध्ये परमेश्वराचा अंश आहे. म्हणजेच परमेश्वर आपल्या आत्म्या मध्ये राहतो. सर्व आत्म्याचा अंश मिळून बनलेली जागृत शक्ती म्हणजेच परमेश्वर आहे.
बाबा जुमदेवजींनी बाबा हनुमानजीला विनंती केल्यावर प्रतिज्ञा केली की, मी आजपासून कोणत्याही देवाला मानणार नाही. बाबांनी प्रतिज्ञा केल्याप्रमाणे त्या शक्तीचे संशोधन करण्यास सुरुवात केली. त्यांनी हनुमानजीसमोर प्रश्न ठेवला की, "हे हनुमानजी, संसारमें ऐसी कौनसी शक्ती है, जो सैतानको एक पलमें निकाल सके। भूत किसे कहे और भगवान किसे कहे ! इसका स्पष्टीकरण हमें समझा दो ।" या वेळेस बाबा स्वतः निराकारमध्ये आले आणि परमेश्वररूपी (बाबा हनुमानजी) बाबांच्या मुखकमलातून असे शब्द निघाले की, "यह एकही परमेश्वर है, जिसने इस सृष्टिका निर्माण किया है। वह एक जागृत शक्ती है जो निराकार है। वह चोवीस घंटे चैतन्य है।
बाबांच्या मुखकमलातून असे उद्गार निघाले की, "मैं सबका एक भगवान हूँ। सेवक, तू मुझे कहाँ ढूँढ रहा है। मैं चोबीस घंटे तेरे पास हूँ । जो क्षण मैं तुझसे छुट जाऊँगा, तेरा शरीर मृत हो जायेगा।" तेव्हा बाबांना वाटले की, 'मैं' कितना पागल हूँ। भगवान मेरे पास होकर मैं उसे कितना लम्बा ढूँढ रहा हूँ।' हे सर्व शब्द बाबांच्या कानांवर पडत होते. ते देहभान विसरले होते तरी त्यांना ते समजत होते. काही वेळाने त्याच निराकार अवस्थेत असताना एका क्षणी त्यांच्याच मुखकमलातून पुन्हा असे शब्द निघाले की, "सेवक मैं भगवान हूँ । तू मानव है। मैं जानता हूँ, मानव यह बेइमान है । उनमेंसे तू एक मानव है। भलेही तूने मुझे प्राप्त किया, मैं भगवान हूँ। मैं मानवपर कदापिही विश्वास नहीं करता।" हे शब्द बाबांच्या कानी पडले, तेव्हा ते निराकार अवस्थेतच विचारमग्न झाले. भगवंताने मला बेइमान म्हटले असे त्यांना सारखे वाटू लागले. त्यांनी खूप वेळ विचार केला आणि ते त्याचे उत्तर शोधू लागले. काही वेळाने त्यांना उत्तर सापडले की याचे उत्तर 'इमान' हेच आहे आणि इमान हाच भगवान आहे असे समजून त्यांनी भगवंताजवळ प्रतिज्ञा केली की, 'हे भगवन् मैं जीवनमें इमान रखूँगा और सत्य सेवा करूँगा' ऐसा आपको सत्य वचन देता है। यानंतर परत विचार केला की, चोवीस तास मानवाजवळ असणारी अशी कोणती शक्ती आहे जी नाहीशी झाल्यावर शरीर मृत होते? यावर विचार केला असता त्यांना 'आत्मा' ही शक्ती आठवली. म्हणून पुन्हा त्यांच्या मुखकमलातून असे शब्द निघाले की, "परमात्मा एक। मरे या जिये भगवत् नामपर । हे बाबांचे वचन होते जे त्यांनी एका परमेश्वराला दिले. पुन्हा थोड्या वेळाने बाबांच्याच मुखकमलातून असे शब्द बाहेर निघाले की, दुःखदारी दूर करते हुये उद्धार । इच्छा अनुसार भोजन। हे दोन वचन परमेश्वराने बाबांना दिले असे त्यांना वाटले.
बाबांनी या मार्गात एकच परमेश्वर मानला आहे. बाबा हनुमानजी हे महान्त्यागी बाबा जुमदेवजी यांचे गुरू आहेत. त्यांनीच बाबांना एका परमेश्वराची ओळख करून दिली. परंतु हनुमानजी हे या मार्गाचे परमेश्वर नाहीत. परमेश्वर ही व्यक्ती नसून चोवीस तास जागृत असणारी दैवी शक्ती आहे. ती निराकार आणि चैतन्यमय आहे. प्रत्येकाच्या आत्म्यात ती शक्ती विराजमान आहे. म्हणून प्रत्येक मानव हा चैतन्य आहे. या दैवी शक्तीला आकारात दाखविता येत नाही तर बाबांनी दिलेल्या तत्व, विश्वास आणि त्याग यामुळे ती आकारात दाखविता येते म्हणजेच त्याचे गुण दिसतात.
बाबा नेहमी सांगतात की भगवंत निर्जीव मध्ये वास करीत नाही तर तो सजीव वस्तूंमध्ये वास करतो. त्यामुळे त्याचा आत्मा हा चैतन्य असतो. परमेश्वराने बाबांना त्यांच्या आत्म्यात आपली ओळख करून दिली आहे. म्हणून बाबा हे प्रत्येक मानवाच्या आत्म्यात परमेश्वर पाहतात. जो चोवीसतास त्याचे जीवन चैतन्यमय बनवितो. म्हणून बाबा स्वतःचा आत्मा आणि दुसऱ्याचा आत्मा सारखाच आहे असे समजून कोणालाही आपल्या पाया पडू देत नाहीत कारण एका आम्यापुढे दुसरा आत्मा झुकेल. त्यामुळे आत्म्याचा अपमान होईल आणि पर्यायाने परमेश्वराचा अपमान होईल असे ते समजतात. कारण आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. हीच शिकवण त्यांनी मानवाला म्हणजेच (सेवकाला) दिली आहे. परमेश्वर हा इतरत्र कुठेही नसुन तो आपल्या आत्म्यातच आहे. आणि चोवीस तास वास करतो. हे आपल्या महानत्यागी बाबा जुमदेवजींनी सिद्ध करुन दाखविले आहे.
नमस्कार...
( टिप:- हि माहिती कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )
वरिल माहिती मानवधर्म परिचय पुस्तिक मधील आहे.
सौजन्य :- सेवक एकता परिवार
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर नागपूर
★ सेवक एकता परिवार ★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Sharechat )
https://sharechat.com/profile/sevakektaparivar?d=n
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/
No comments:
Post a Comment