महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी आपल्याला सर्व सेवकांशी नमस्कार घ्यायला का सांगितले आहे.
( नमस्काराचे काय महत्त्व आहे. )
नमस्काराचे महत्त्व नक्की वाचा
मानवाने भगवंताच्या चरणावर मरुन त्याला उभे केले पाहिजे आणि त्याने सर्व कार्य भगवंताला समोर ठेवून केले तर तो नेहमी सुखी आणि समाधानी राहू शकतो. बाबांनी या मार्गात एकच परमेश्वर मानला आहे. बाबा हनुमानजी हे महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे गुरू आहेत. त्यांनीच बाबांना एका परमेश्वराची ओळख करून दिली परमेश्वर ही व्यक्ती नसुन चोवीस तास जागृत असणारी दैवी शक्ती आहे. ती निराकार आणि चैतन्यमय आहे. प्रत्येकाच्या आत्म्यात ती शक्ती विराजमान आहे. म्हणून प्रत्येक मानव हा चैतन्य आहे. या दैवीक शक्तीला आकारात दाखविता येत नाही. तर बाबांनी दिलेल्या तत्व, विश्वास आणि त्याग यामुळे ती आकारात दाखविता येते म्हणजेच त्याचे गुण दिसतात.
बाबा नेहमी सांगतात की भगवंत निर्जीव वस्तू मध्ये वास करित नाही. तर सजीव वस्तू मध्ये वास करतो. त्यामुळे त्याचा आत्मा हा चैतन्य असतो. परमेश्वराने बाबांना त्यांच्या आत्म्यात आपली ओळख करून दिली आहे. म्हणून बाबा हे प्रत्येक मानवाच्या आत्म्यात परमेश्वर पाहतात. जो चोविसतास त्याचे जीवन चैतन्यमय बनवितो. म्हणून बाबा स्वतः चा आत्मा आणि दुसर्याच्या आत्मा सारखाच आहे. असे समजून कोणालाही पाया पडू देत नाही. कारण एका आत्म्या पुढे दुसरा आत्मा झुकेल. त्यामुळे आत्म्याचा अपमान होईल. आणि पर्यायाने परमेश्वराचा अपमान होईल. असे ते समजतात. कारण आत्मा हा परमात्म्याच्या अंश आहे. हीच शिकवण बाबांनी मानवाला ( सेवकाला ) दिली आहे.
या मार्गातील सेवकाला कोणत्याही मंदिरात नमस्कार करता येत नाही.आपण अनेकात होतो तेव्हा आपण एकमेकांचा पाया पडत होतो. परंतु महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची ओळख करून देऊन आपल्याला एकमेकांचा पाया पडून प्रत्येक आत्म्याचा अनादर होत होता. त्यापासून बाबांनी आपल्याला एकमेकांना नमस्कार करायला सांगितले. आपण सेवकांना नमस्कार करून प्रत्येक आत्मरूपी भगवंताचा आदर करतो. नमस्कार म्हणजे नमन होय आपल्यापेक्षा लहान असो किंवा मोठे , गरिब असो किंवा श्रीमंत, शिक्षित असो किंवा अशिक्षित कसलाही भेद भाव न करता नमस्कार घेतो. कारण आत्मरुपी परमेश्वर प्रत्येकात आहे. म्हणून सर्व मानव समान आहेत. याप्रकारे नमस्कार घेतल्याने आपल्यातला अहंकार नाहीसा होण्यास मदत होते.
नमस्कार घेतल्याने आपल्या भारतीय संस्कृतीची सुद्धा ओळख होते. नमस्कार या शब्दात आपल्यातील एकतेची ओळख होत असते. एखाद्या व्यक्तीशी बोलायला सुरुवात जेव्हा आपण करतो तेव्हा आधी नमस्कार या शब्दाचा प्रथम वापर करून करतो. तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्या बद्दल काही गैरसमज असल्यास तो विसरून जातो. समोरच्या मनात आपल्या बद्दल प्रेमाची भावना निर्माण होत असते. आणि म्हणूनच म्हटले जाते की नमस्कार में ही चमत्कार है. नमस्कार म्हणजे मोठ्यांचा आशिर्वाद आहे. तिथे मानसन्मान दिला जातो. कारण नमस्कारत प्रेम आहे., नमस्कारात विनय आहे., नमस्कारात अनुशासन आहे., नमस्कार आदर शिकवतो., नमस्कारामुळे मनात सुविचार येतात., नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो., नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो., नमस्कारात शीतलता आहे., नमस्कारात आपण सेवक असल्याची ओळख होते.,
नमस्कार...
( टिप:- ही पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )
सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार
( Social Media Platform)
🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎
★ सेवक एकता परिवार ★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/
No comments:
Post a Comment