Saturday, March 27, 2021

परमात्मा एक मानवधर्मातील सेवकांनी होळी कशाप्रकारे साजरी करावी. यावर विशेष माहिती

         "मानवधर्म" व "होळी"

परमात्मा एक मानवधर्मातील सेवकांनी होळी सण कशाप्रकारे साजरा करावा यावर विशेष माहिती नक्की वाचा.



            परमात्मा एक मानवधर्मातील सेवकांनी 
                होळी कशाप्रकारे साजरी करावी.
                        यावर विशेष माहिती

       आपण मार्गात प्रवेश करतेवेळी परमेश्वराला वचन दिले आहे."भगवान बाबा हनुमानजी मी जिवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले. मी मरिन किंवा जगीन जीवनात एकच परमेश्वराला मानीन" परमेश्वराला दिलेल्या या वचनानुसार आपल्याला मानवधर्मात कुठलाही सण नाही. पण हिंदू धर्म संस्कृतीत राहून समाजात असतांना आपण हिंदू धर्मातील सण आपण आपल्या मानव धर्माच्या नियमात राहून साजरा करू शकतो. ज्याप्रमाणे आपण मानव धर्मातील सेवक दसरा, दिवाळी सण साजरा करतो त्याच प्रमाणे होळी सण सुद्धा आपल्या मानव धर्मातील नियमात राहून साजरा करू शकतो. 

      होळी हा सण आपल्या देशात खुप उत्साहाने साजरा करतात. आपण सुद्धा एकमेकांना रंग लावून होळी या सणाचा आनंद घेत असतो. पण आपल्याला या मानवधर्मा मध्ये दारू आणि दारू पिणाऱ्या व्यक्ती पासुन दूर राहायचे आहे. आणि हा सण पण साजरा करायचा आहे .

     आपण होळी हा सण साजरा करत असतांना रंग 🎨 व पाण्याचा 💧 जास्त प्रमाणात उपयोग करतो. त्यामुळे आपल्याला काहीच फायदा होत नाही. उलट नुकसानच होते. आपण या आधीच्या होळीला पाहिले आहे रंगामुळे आपली स्कीन खराब होते. आणि पाण्याचा दुरुपयोग होते. याच पाण्याची बचत आज केली तर येणारा उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही. म्हणून आपण मानव धर्माचे सेवक जर समाजाला एक प्रेरणा देऊ शकेल याप्रकारे होळी सण साजरा करू शकतो व पाण्याच्या दुरुपयोग टाळू शकतो .

      आपण होळी खेळत असतांना आरडाओरड किंवा डीजे लावून ध्वनीप्रदूषण करत असतो. याच दिवसात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असतात. यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रीत होऊन याकडे आकर्षित होतात. व त्यांचा परिक्षेच्या अभ्यासावर परिणाम होतात. यामुळे त्यांना परिक्षेत कमी गुण मिळाल्याने त्यांचे समोरच भविष्य खराब होतो. म्हणून आपण सेवकांनी जर साध्यासुध्या व शांततेने होळी खेळली तर त्यांचा भविष्यात आपणच काही प्रमाणात प्रेरणादायी बनू शकतो .

         आपल्या मानव धर्मातील सेवकांनी आपल्या परिसरातील, गावातील सेवकांचा घरी जाऊन त्यांना गुलाल लावून होळी सणाच्या शुभेच्छा देऊन होळी हा सण त्यांच्या सोबत साजरा करू शकतो. त्यामुळे ते सेवक सुद्धा अनेकांचा दुर राहतील आणि आपण सुद्धा जवळपास दोन-चार घराचे सेवक असतील तर आपण त्यांच्याशी मानव धर्मावर संवाद साधू शकतो. आणि होळी या सणाचा आनंद ही घेऊ शकतो. 

       आपल्या परिसरात किंवा गावात एक किंवा दोनच घराचे सेवक असतात. आणि आपण अनेका सोबत होळी साजरी करतो म्हटले. तर त्या दिवशी दारू पिणारे असतात. आणि आपल्या दारू पिणाऱ्या पासुन दुर राहायचे आहे. म्हणून सेवकांनी आपल्या जवळच्या सेवकां सोबत होळी साजरी करावी. आणि सेविका ताईंनी सुद्धा आपल्या परिसरातील सेविका ताई सोबत होळी या सणाचा आनंद घ्यावा .

       माझ्या मते होळी या सणाचा दिवशी आपण सेवक आपल्या परिसरातील सेवकांसोबत मिळून मिसळून होळी हा सण साजरा करू शकतो. आणि आपण सर्व एकाच मानव धर्माचे सेवक आहोत तर या होळीच्या दिवशी आपण एकत्र येऊन नविन सेवकांशी ओळख होते. आणि एका भगवंताची चर्चा बैठक घेऊन त्यानंतर एकमेकांना गुलाल लावून अल्पोहार घेऊन एकमेकांना शुभेच्छा देऊ शकतो. आणि होळी हा सण आपण सेवकां सोबत साजरा करू शकतो. कारण माझ्या माहितीप्रमाणे असे भरपूर ठिकाणी होतात. म्हणून आपण सर्वांनी पर्यावरण पूरक व कोरडी होळी साजरी करावी असे मला वाटते .

नमस्कार....!

( टिप:- ही पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )

सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार 
                   ( Social Media Platform)


🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎

             ★ सेवक एकता परिवार ★
             ( Social Media Platform )

©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/


©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1

©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q

©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/

Saturday, March 20, 2021

बाबांनी भगवत गुणांचे तीन शब्द दिले आहे. | ३) "प्रेमाने वागने" यावरिल विचार नक्की वाचा व आवडल्यास शेअर करा.

 



  ( बाबांनी भगवत गुणांचे तीन शब्द दिले आहे. )

             [ ३) "प्रेमाने वागने" ]

         बाबांनी भगवंत गुणांचे तीन शब्द दिले आहेत त्यातील तिसरा शब्द प्रेम आहे. प्रेम हा शब्दच ऐकता मन प्रफुल्लित होतो. आपल्या कुटुंबात व सेवकात प्रेमाची वागणूक असावी. आपल्या परिवारात एकमेकांवर ज्या प्रमाने प्रेम असते. त्याचप्रमाणे भगवंताचे कार्य एकतेने प्रेमाने करावे. प्रेम हा  भगवंताला आवडणारा गुण आहे.


        आपल्या कुटुंबात असो किंवा सेवकात आपले शब्द नेहमी प्रेमाचे असावे. कोणी कितीही रागावले तरी चालेल. पण आपण प्रेमानेच बोलावे. प्रेमाने कुणाचेही मन जिंकता येते. एक जुनी म्हण आहे. "ढाई अक्षर प्रेम का, पढे सो पंडित होय." भगवंता विषयी प्रेम ठेवा. भगवंत सर्वच देतो.


        प्रेम दिल्याने प्रेम मिळेल. बाबांनी प्रत्येक आत्म्यात परमेश्वर दाखविला आहे. आणि प्रत्येक आत्म्याचा आदर ठेवून आपले शब्द बोलायला पाहिजे. प्रत्येक शब्द हा प्रेमाने बोलावा. आपल्या शब्दाने दुसर्या आत्म्याचा अनादर होऊ नये. दुसर्या आत्म्याचा अनादर केल्यास त्याचा नव्हे तर परमेश्वराचा अनादर होतो. कारण आपली आत्मा ही परमात्मा एक अंश आहे. त्याकरिता कोणाचाही अपमान होणार नाही याची काळजी घेऊन आपले शब्द प्रेमानी वापरावे. बाबा कधीही कुणावर रागावले नाही. सर्वांशी प्रेमाने संवाद साधायचे. बाबांचा शिकवणीप्रमाणे आपल्याला पण प्रेमानेच वागायचे आहे. प्रेमाने बोलायचे आहे.


         प्रेमाची परिभाषा वेगळीच असते. आपल्या परिवारात, आपल्या कामात, व्यवहारात प्रेमाची वागणूक ठेवली की, मोठ्यात मोठा शत्रु सुद्धा बदलतो.   प्रेमाने मन जिंकता येते. पण हेच प्रेम स्वार्थी झाले तर प्रेमाने आपली फसवणूक पण करतात. म्हणून हुशार पण राहने तेवढेच महत्त्वाचे आहे. आपले कर्म प्रेमाने आणि मर्यादित केले तर परमेश्वर आपले कधी ही वाईट होऊ देणार नाही. परमेश्वराला आवडणारे गुण सत्य, मर्यादा व प्रेम आपल्या अंगी असले तर परमेश्वर आपल्याला कुठेही काहीही कमी पडू देणार नाही. 


माझ्या लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.


नमस्कार...!


( टिप:- ही पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )


सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार 

                   ( Social Media Platform)



🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎


             ★ सेवक एकता परिवार ★

             ( Social Media Platform )


©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )

https://www.facebook.com/SevakEktaParivar/



©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )

https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1


©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )

https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q


©️ सेवक एकता परिवार ( Instagram )

https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/

Tuesday, March 16, 2021

[ "अनुभव सागर" क्रं. ०१ ] परमात्मा एक मानवधर्मातील सेवकांचे परमेश्वरी कृपेचे सत्य अनुभव नक्की वाचा.

 



                   [ "परमात्मा एक मानवधर्म" ] 

                          [ "अनुभव सागर" ]


माझे नाव आशिष गंभीरजी भोयर आहे.आज मी माझे अनुभव मार्गात येण्याचे कारण सांगत आहे .  


           मी अनेकात असताना आमच्या वरती अनेक प्रकारचे दु:ख येत होते. मी  हवन कार्यात जात होतो. आणि हवन कार्यातुन घरी आलोकी मी आई बाबाला म्हणत जायचा की आपण परमात्मा एक चा मार्ग घेऊन काय तर आई बाबा म्हणायचे आपन घरात मोठे आहे आणी आपन मार्गात नाही यऊ असे मनत होतो.

 

         माझी आई काही दिवसांनी मरण पावली तेव्हा माझ्या मीञाची आई मला नेहमी म्हणत असे की तुम्ही मार्गात येऊन जा माझे आईचा मृत्यू साप चावल्याने झाला तो दिवस राखीचा होता. मग मी कंपनीत कामाला लागलो दोन तीन वर्ष  चांगले गेले आणी नंतर मी बीमार झालो डॉक्टर नी सागीतल तुला डेगु मलेरिया आणी काविड झाले विस पंचवीस हजार रुपये खर्च झाले. डॉक्टरांनी ब्लड टेस्ट नॉरमल सांगीतली मी तेव्हा भगवंताला शब्द दिला हे भगवान तु मला मार नाहीतर मला मार्गात आन तेव्हा पन एक आठवडा असाच गेला नंतर मला तसच वाटायच मग मी आनखी माझ्या बाबाला म्हटल की आपन मार्गात येऊन काय तर बाबा हो म्हणाले. 

   

         मग माझ्या घराचा मागे पक्कीचे सेवक राहत होते. त्यांना विचारपुस केले आणी तेव्हा आम्हाला राऊत गुरूजी कडे नेण्यात आले. काकाजी नी आम्हाला मार्गात मरावे लागते असे म्हटले तेव्हा आम्ही मरायला तयार आहे. मग काकाजीने  आम्हाला घरची साफसफाई करायला सांगितले मग आम्ही काकाजीच्या घरून नीगालो आणि मला दिघोरीत ऊलटी झाली आणि मला बर वाटायला लागल मग काकाजीनी आम्हाला तिन दिवसाचे कार्य दीले  मग मी कामाला गेलो मला लूस्त पणा वाटत होती मग कसातरी घरी आलो आणी माझ्या घरी एक सेवकीन बसुन होती तिने मला विचारल काय झालंय म्हणुन मग तिने आपल्या मुलाला बोलावुन तीर्थ करून दिले आणि तेव्हापासुन मी आज पर्यत दवाखान्यात ग़ेलो नाही. आता सर्व सुख समाधानी आहे.

     


लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर मी  "भगवान बाबा हनुमानजी"  व  "महानत्यागी बाबा  जुमदेवजी" यांना श्रमा मागतो.


नमस्कार ...!


माझे नाव :- आशीष गंभीरजी भोयर

पत्ता :- रा, मोहाडी (कुचाडी)

माझे मार्गदर्शक :- मारोतरावजी राऊत (गुरूजी) 

परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर


( टिप :- वरिल पोस्ट कोणीही कॉपी करू नये. त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावे. )


सोशल मीडिया प्रकाशन:- सेवक एकता परिवार

                                   ( Facebook Page )


🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎


.                    ★ सेवक एकता परिवार ★

                 ( Social Media Platform )


             


©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )

https://www.facebook.com/SevakEktaParivar/


©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )

https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1


©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )

https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q


©️ सेवक एकता परिवार ( Instagram )

https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/

Saturday, March 13, 2021

बाबांनी भगवत गुणांचे तीन शब्द दिले आहे. | २) "मर्यादा पाळने" यावरिल विचार नक्की वाचा व आवडल्यास शेअर करा.

 

 

   ( "बाबांनी भगवत गुणांचे तीन शब्द दिले आहे." )

                        २) "मर्यादा पाळने"


       "मर्यादा" ही आपल्या जीवनाचा एक भाग आहे. मर्यादा बोलण्यात पाहिजे. वागण्यात पाहिजे. आपण मानवधर्माचे सेवक असुन आपल्याला आपल्या कुटुंबात व सेवकात मर्यादेत राहून बोलणे, वागणे पाहिजे. आपल्या पेक्षा लहान असो किंवा मोठा असो समोरच्या व्यक्तीचा मान ठेवून सन्मान करून मर्यादित बोलले पाहिजे. एक म्हण आहे. "जैसा दोगे, वैसा पाओगे"  या म्हणी प्रमाने आपण समोरच्या व्यक्तीला मान देऊन मर्यादित बोलले तर तोही आपल्याशी मानाने बोलणार. लहान तोंडी मोठा घास घेऊ नये.


     आपल्याशी कोणी भांडण ही करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या निंदा ही करत राहिले तरी सुद्धा आपण मानवधर्माचे सेवक आहोत ह्याचा भान ठेवून त्यांच्याशी मर्यादित व मानानेच बोलावले. तोही एक दिवस शांत राहिल. आपल्या वडिलधारी लोकांचा मान ठेवावे. आपल्या कुटुंबात मर्यादित बोलावे. सेवकात सुद्धा मर्यादित राहून बोलावे.


       आपल्या मुखातून निघालेला शब्द हा आपल्या मनातून निघालेल्या शब्दाचा दुसर्याच्या मनावर वाईट परिणाम किंवा त्यांचे मन दुखावणार नाही असा शब्द बोलू नये. शब्द मर्यादित असावा. "शब्दाला नाही हात - पाय, एक शब्द करे घाव, एक शब्द करे औषध" या म्हणी प्रमाने आपल्या शब्दावर नियंत्रण ठेवून मर्यादित राहून आपल्या शब्दाचा चांगला वापर करावा. जीवन जगत असतांना आपल्याला भरपूर असे उदाहरण देता येईल ज्यामुळे आपली मर्यादा राहत नाही. आपल्या परिवारात पुष्कळ गोष्टींची मर्यादा आहेत. की ज्यांचा आपण कधी विचार ही करत नाही.


       बाबांनी याच गोष्टीचा विचार करुन भगवंत गुणांचे तीन शब्द दिले असावेत. कारण या तीनही शब्द भगवंताला आवडणारे आहे परमेश्वराला प्रिय असणारे शब्द बाबांनी आपल्याला पाळायला दिले आहे. त्यामुळेच आज आपण सुखी - समाधानी आहोत. परंतु आजच्या परिस्थितीत काही गोष्टींची मर्यादा आजही आपल्यात नाही. त्यामुळे सेवकात एकता दिसुन येत नाही. स्व मर्जीने वागतात स्व मर्जीचे कार्य करतात. कुणाचाही मान न ठेवता चुकिचे कर्म करतात. बाबांचा शिकवणीला विसर पडत आहे. यात किती मोठ्या प्रमाणात मर्यादेचे पालन होत नाही हे त्यांचा लक्षात अजुनही येत नाही. बाबांचे शब्द आहे. "जो जागेगा वो पायेगा, जो सोयेगा वो खोयेगा"  एक त्यांनाही सत्य, मर्यादा व प्रेम कळेल. याकरिता सत्याला जागा, मर्यादेला पाळा व प्रेमाने वागा.


माझा लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.


नमस्कार...!


( टिप:- ही पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )


सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार 


                   ( Social Media Platform)



🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎


               ★ सेवक एकता परिवार ★

            ( Social Media Platform )


©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )

https://www.facebook.com/SevakEktaParivar/



©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )

https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1


©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )

https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q


©️ सेवक एकता परिवार ( Instagram )

https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/

Friday, March 12, 2021

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा ३ एप्रिल जन्मोत्सवा निमित्त स्टेट्स | परमात्मा एक स्टेट्स

 

Parmatma Ek WhatsApp Status


   ( माझ्या जुमदेव बाबाची जयंती हायना )

परमात्मा एक सेवकांकरिता व्हाट्स ॲप स्टेट्स


सेवकांकरिता नवनवीन व्हाट्स ॲप स्टेट्स बघण्यासाठी आपल्या या युट्यूब चैनल वर भेट देऊन YouTube Channel ला Subscribe नक्की करा.


स्टेट्स बघण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघावे.

युटयुब लिंक:- https://youtu.be/oo_1p8G7A8k




🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎

सौजन्य:-        ★सेवक एकता परिवार★
             ( Social Media Platform )

©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/

©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1

©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q

©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/




Tuesday, March 9, 2021

Parmatma Ek Status | 8D DJ REMIX Song | Manav Dharmachi Shala Bharali Song

 


Parmatma Ek WhatsApp Status


          ( मानवधर्माची शाळा भरली  )

परमात्मा एक सेवकांकरिता व्हाट्स ॲप स्टेट्स


सेवकांकरिता नवनवीन व्हाट्स ॲप स्टेट्स बघण्यासाठी आपल्या या युट्यूब चैनल वर भेट देऊन YouTube Channel ला Subscribe नक्की करा.


स्टेट्स बघण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघावे.

युटयुब लिंक:- https://youtu.be/bSX58_BG8VU




🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎

सौजन्य:-        ★सेवक एकता परिवार★
             ( Social Media Platform )

©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/

©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1

©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q

©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/


Saturday, March 6, 2021

बाबांनी भगवत गुणांचे तीन शब्द दिले आहे.| १) "सत्य बोलने" यावरिल विचार नक्की वाचा व आवडल्यास शेअर करा.

 


        ( बाबांनी भगवत गुणांचे तीन शब्द दिले आहे. )

                             १) "सत्य बोलने"


बघा आजच्या काळात सत्याची खुप गरज आहे. जसे सत्य बोलने, सत्याने वागणे, सत्याचा व्यवहार करणे. सत्य म्हणजे खर आणि आपण फारसे लोकांना बघीतले आहे आणि अनुभवले आहे की जास्तीत जास्त खोटयाचा व्यवहार करतात, बोलतात. आजची परिस्थिती अनुभवली तर प्रत्येक मानव हा आपल्या प्रपंचा करिता, मोठा होण्याकरिता, नावाकरिता खोटयाने वागत आहेत. त्याच्यात मोह, माया व अहंकार आहे. त्यामुळे त्याला सत्याचा ज्ञान नाही. 


▶महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानव धर्मातील सेवकांना सत्याचा परिचय करून दिला आहे. "सत्य ही परमेश्वर है! और परमेश्वर ही सत्य है"! या मानवधर्मात मानव मर्जी चालत नाही तर भगवंत मर्जी चालते. बाबांनी भगवंत गुणांचे तीन शब्द दिले आहेत. सत्य, मर्यादा व प्रेमाने वागणे. म्हणजेच मोह, माया व अहंकाराचा त्याग करून सत्य, मर्यादा व प्रेमाने वागणे. सत्य, मर्यादा व प्रेम भगवंताला आवडणारे गुण आहे. आणि हे गुण मानव धर्मातील प्रत्येक सेवकांचा अंगी असावे. 


▶आपण मानव धर्मातील सेवक असुन आपल्याला अनेकांच्या समाजात वावरत असतांना काही अनेकातील लोक आपल्याला आजमावून पाहतात. जसे विनाकारण आपल्याशी भांडण करतील, तर कधी खोटा व्यवहार करतील, तर काही खोट बोलणार व आपली फसवणूक करण्याचा प्रयत्न करतील पण आपले एक चित्त, एक लक्ष भगवंता कडे पाहिजे व तत्व, शब्दाचे तंतोतंत पालन केले तर आपल्याला कोणीही काहीही करू शकणार नाही. आणि सत्याने जो वागेल त्याचा पायाला काटा ही रूतणार नाही ही या मार्गाची ग्वाही आहे. प्रत्येक सेवकांना आज अनुभव आहे की अनेक वाले आपल्याशी खोटा व्यवहार करून पाहतात पण आपण डगमगु नये .


▶एक म्हण आहे. शब्द ही भगवान है! शब्द ही शैतान है! याकरिता आपल्या मानव धर्मातील सेवकांनी आपल्या कुटुंबात व सेवकात शब्द सांभाळून बोलावे. प्रत्येक शब्द हा सत्याचा असावा. सत्याने बोललेल्या शब्दाचा परिणाम समोरच्या व्यक्तीवर औषधीचे काम करतो. तोच शब्द खोटा, असत्याचा असेल तर समोरच्या व्यक्तीवर घाव करतो कारण तो सैतानाचा शब्द होतो. म्हणूनच म्हटले आहे की एक शब्द करे औषध, एक शब्द करे घाव. बोलतांना शब्दाचा प्रयोग हा सत्याचा असावा. आपल्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हा आत्म्यातुन निघतो. आणि तो शब्द दुसर्या आत्म्याचा अपमान होणार नाही अश्या शब्दाचा वापर करावा. बाबांनी प्रत्येक आत्म्यात परमात्मा दाखविला आहे. याकरिता नेहमी सत्याचीच बाजू मांडावी. सत्यानेच बोलावेत. 



माझ्या लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो .


नमस्कार...!


( टिप:- ही पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )


सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार 

                   ( Social Media Platform)



🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎


             ★ सेवक एकता परिवार ★

             ( Social Media Platform )


©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )

https://www.facebook.com/SevakEktaParivar/



©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )

https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1


©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )

https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q


©️ सेवक एकता परिवार ( Instagram )

https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/

Wednesday, March 3, 2021

आतुरता ३ एप्रिल ची "महानत्यागी बाबा जुमदेवजींचा" जन्मोत्सव लवकरच.. परमात्मा एक स्टेट्स

 

Parmatma Ek WhatsApp Status


   (आतुरता ३ एप्रिल ची जयंती माझ्या बाबाची )

परमात्मा एक सेवकांकरिता व्हाट्स ॲप स्टेट्स


सेवकांकरिता नवनवीन व्हाट्स ॲप स्टेट्स बघण्यासाठी आपल्या या युट्यूब चैनल वर भेट देऊन YouTube Channel ला Subscribe नक्की करा.


स्टेट्स बघण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघावे.

युटयुब लिंक:-https://youtu.be/j3PcsCjcx_4





🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎

सौजन्य:-        ★सेवक एकता परिवार★
             ( Social Media Platform )

©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/

©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1

©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q

©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/


परमात्मा एक मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा.

  "परमात्मा एक" मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा.         !! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!       !! महानत्याग...