Saturday, February 27, 2021

"चार तत्व" | ४) "इच्छा अनुसार भोजन" यावरिल विचार नक्की वाचा व आवडल्यास शेअर करा.

 


      मानव जन्माला आला की सुखी जीवन जगण्यासाठी बरेच गोष्टींची आवश्यकता असते. आणि आपले जीवन सुखी समाधानी कसे होईल याकडे जास्त लक्ष असते. तेव्हा आपण भगवंताकडे आपल्याला पाहिजे असलेल्या वस्तुंची इच्छा केली असता भगवंत ती वस्तूची सहजरीत्या देतो.  हेच इच्छा अनुसार भोजन आहे. इच्छा अनुसार भोजन याचा अर्थ असा नाही की आज आपण आपल्या इच्छेनुसार भोजन करायचे.  आपण भगवंताला केलेली इच्छा तो भगवंत योग देतो आणि आपल्या इच्छेनुसार आपल्याला फळ देतो. यालाच इच्छा अनुसार भोजन असा याचा अर्थ आहे. 

   

         इच्छा अनुसार भोजन याचे बरेच उदाहरण भगवत कार्याने निघतात. आपण भगवंताला एखाद्या दुःखा मुळे, काही अपेक्षा पूर्ण होण्याकरिता, आपल्या कामात, परिवारात अशा अनेक इच्छा भगवंताला विनंती केली असता भगवंत योग देऊन आपल्या इच्छा पूर्ण करतात. 

 

        इच्छा अनुसार भोजन या तत्वाचा खरा अर्थ महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका सेवकांचा अनुभवातून दिला आहे. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा "मोगरकसा" जवळ "मंगरली"या  गावी दौरा होता. बाबा सोबत बरेच सेवक होते. तेव्हा त्यांना एक दिवस रात्र झाली असता. सेवकांनी बाबांना चहा घेऊ अशी विनंती केली व ज्या सेवकांकडे बाबा थांबले तो सेवक गवळी होता. तेव्हा सेवकांनी बाबांना म्हटले बाबा दुधाचा चहा पिऊ या तेव्हा बाबांनी त्या गवळी सेवकाला म्हटले. आज हमे दुध की चाय चाहिए. तेव्हा तो सेवक म्हणला बाबा एवढ्या रात्री दुध कुठून आणू. तेव्हा बाबा म्हणाले आज हमे दुध की चाय चाहिये. बाबांनी म्हटले ज्या म्हशीने एकही थेंब दुध दिले नाही त्या म्हशीला समोर आण आणि भगवंताला अगरबत्ती लावून कापूर लाव आणि विनंती कर भगवान बाबा हनुमानजी महानत्यागी बाबा जुमदेवजी को दुध की चाय चाहिए. तेव्हा त्या म्हशीने दोन लिटर दुध दिले. आणि बाबा म्हणाले या दुधात एकही थेंब पाणी टाकू नका आणि एकही थेंब दुध वाचुन नका पूर्ण दुधाचा चहा करा. तेव्हा तो सेवक बाबांना म्हणाला बाबा आणखी एक म्हशी दुध देईल का. तेव्हा बाबा म्हणाले त्या सेवकाला तुझा भगवंतावर पूर्ण विश्वास असेल तर देईल. परमेश्वराने माझी इच्छा पूर्ण केली. मला माझ्या इच्छेनुसार मिळाले. भगवंताला आवडणारे गुण तुझ्या जवळ असेल तर तुलाही मिळेल. यावरून हेच सिद्ध होते की परमेश्वराला केलेली विनंती ही परमेश्वराला आवडणारे गुण आपल्या अंगी असायला पाहिजे आणि भगवंतावर पूर्ण विश्वास असायला पाहिजे. तर परमेश्वर आपल्या इच्छेनुसार आपल्याला फळ तेव्हाच देतो. 

   बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द व नियमाचे आपल्या जिवनात तंतोतंत पालन करावे लागेल आणि भगवंताला केलेली विनंती भगवंत योग देतो. म्हणजेच आपल्या इच्छेनुसार भोजन देतो. याचाच अर्थ इच्छा अनुसार भोजन असा होतो. 


माझ्या लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.


नमस्कार...!


( टिप:- ही पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )


सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार 

                   ( Social Media Platform)



🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎


             ★ सेवक एकता परिवार ★

             ( Social Media Platform )


©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )

https://www.facebook.com/SevakEktaParivar/



©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )

https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1


©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )

https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q


©️ सेवक एकता परिवार ( Instagram )

https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/

Saturday, February 20, 2021

३ एप्रिल "महानत्यागी बाबा जुमदेवजी" जन्मोत्सव लवकरच... | परमात्मा एक स्टेट्स

 

Parmatma Ek WhatsApp Status


   (माझ्या जुमदेव बाबाची बघा जयंती हायना )

परमात्मा एक सेवकांकरिता व्हाट्स ॲप स्टेट्स


सेवकांकरिता नवनवीन व्हाट्स ॲप स्टेट्स बघण्यासाठी आपल्या या युट्यूब चैनल वर भेट देऊन YouTube Channel ला Subscribe नक्की करा.


स्टेट्स बघण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघावे.

युटयुब लिंक:-https://youtu.be/nHy41YLryeA




🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎

सौजन्य:-        ★सेवक एकता परिवार★
             ( Social Media Platform )

©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/

©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1

©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q

©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/




"चार तत्त्व" | ३) "दुःख दारी दुर करते हुये उद्धार" यावरिल विचार नक्की वाचा व आवडल्यास शेअर करा.

 


      महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती करत असतांना बाबांनी  परमेश्वराला दोन शब्दाचे वचन दिले "परमात्मा एक", "मरे या जिये भगवत नाम पर" यावर भगवंत बाबांवर प्रसन्न होऊन बाबांना दोन शब्दाचे वचन दिले "दुःख दारी दुर करते हुये उद्धार", "इच्छा अनुसार भोजन" हे या मार्गाचे तत्व आहे. तेव्हा पासून बाबांनी सर्व पुजा बंद करून एकच भगवंताला मानुन एकाच भगवंताचे कार्य केले आणि सर्वांना आदेश दिला. सर्व जुनी पुजा बंद करून एकाच भगवंताला मानायचे. बाबांनी दिलेल्या वचनाचे आणि भगवंताने बाबांना दिलेल्या वचनाचे बाबांनी चार तत्व जिवनात पालन करायला सांगितले. या मार्गातला सेवक चार तत्त्वाचे पालन करेल तो कधीही दुःखी आणि गरिब राहणार नाही. ज्या प्रमाणे बाबांनी भगवंताला वचन दिले आणि भगवंताने बाबांना २४ तास चैतन्य मय शक्तीचा परिचय करून दिला. त्याच प्रमाणे या मार्गावर येणाऱ्या सेवकाला सुद्धा भगवंताला वचन देऊन आपले दुःख दुर करता येते. आणि बाबांनी दिलेल्या चार तत्त्वाचे आपल्या जिवनात तंतोतंत पालन करावे लागेल. तरच भगवंताची २४ तास चैतन्य मय शक्तीचा अनुभव सेवकाला मिळेल. आणि दुःख दुर होऊन तो सुखी समाधानी होईल.


      मानवाने परमेश्वराला प्रिय असणारे तीन गुण सत्य, मर्यादा व प्रेम नेहमी आचरणात आणले आणि परमेश्वराला प्रिय असणारे कार्य केले तर परमेश्वर कधीही आपल्याला काहीच कमी पडू देत नाही. मोह, माया व अहंकाराचा त्याग केला सर्वांशी सत्याने व्यवहार केला , मर्यादेने वागलो आणि प्रेमाचे आचरण केले. तर तो मानव परमेश्वराला नेहमी प्रिय असतो. जीवन जगत असतांना प्राकृतिक वातावरणामुळे मानवी शरीरावर दुःख येतात.  अनेक प्रकारच्या अडचणी येतात. त्या वेळी अनेक उपचार करतो. त्यावेळी परमेश्वराला समोर ठेवून उपचार केले तर त्याचे दुःख लवकर नष्ट होते. आणि त्याच्या अडी अडचणी दुर होतात. परमेश्वराला समोर ठेवून केलेल्या कामात  परमेश्वर नेहमी साथ देतो.  शेवटी मानवाला परमेश्वर मुक्ती देतो. व त्याला मोक्ष प्राप्त होतो.  मानवाला परमेश्वराचा चरणी स्थान मिळते. याप्रकारे परमेश्वर मानवाचे दुःख दूर करून शेवटी त्याचा जीवनाचा उद्धार करतो.


लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.


नमस्कार...!



( टिप:- ही पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )


सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार 

                   ( Social Media Platform)



🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎


             ★ सेवक एकता परिवार ★

             ( Social Media Platform )


©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )

https://www.facebook.com/SevakEktaParivar/



©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )

https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1


©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )

https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q


©️ सेवक एकता परिवार ( Instagram )

https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/

Sunday, February 14, 2021

Parmatma Ek Status | Ya Manav Dharmachi Shan | 8D DJ REMIX Song

 

Parmatma Ek WhatsApp Status


       (या मानवधर्माची शान बाबा तुझ भवन )

परमात्मा एक सेवकांकरिता व्हाट्स ॲप स्टेट्स


सेवकांकरिता नवनवीन व्हाट्स ॲप स्टेट्स बघण्यासाठी आपल्या या युट्यूब चैनल वर भेट देऊन YouTube Channel ला Subscribe नक्की करा.


स्टेट्स बघण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघावे.

युटयुब लिंक:- https://youtu.be/LYGOodptCYI





🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎

सौजन्य:-        ★सेवक एकता परिवार★
             ( Social Media Platform )

©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/

©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1

©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q

©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/


Saturday, February 13, 2021

"चार तत्त्व" | २) "मरे या जिये भगवत नाम पर" यावरिल विचार नक्की वाचा व आवडल्यास शेअर करा.

 



         महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती करिता खुप परिश्रम केले. बाबांनी भगवंताला प्राप्त करण्याकरिता विधी मांडली व एका परमेश्वराला प्राप्त करत असतांना बाबा विदेह अवस्थेत असतांना बाबांना भगवंतांनी बाबाला दर्शन दिले. तेव्हा भगवंताने बाबाला बेइमान म्हटले. "सेवक मै भगवान हूँ तू मानव है। मानव यह बेइमान है। उसमेसे तू एक मानव हैं। भलेही तुने मुझे प्राप्त किया। मैं भगवान हूं। मै मानव पर कदापि विश्वास नहीं करता"। त्यानंतर बाबांनी परमेश्वराला इमानदारी व निष्काम भावनेने या धरतीवरील दुःखी - कष्टी मानवाला परमेश्वरी कृपेकरिता जगविणयाचे कार्य करिन असे वचन दिले. आणि "परमात्मा एक", "मरे या जिये भगवत नाम पर" असे भगवंताला वचन दिले. त्यानंतर भगवंत बाबांवर प्रसन्न होऊन बाबांना दोन वचन दिले. "दुःख दारी दुर करते हुये उद्धार", व "इच्छा अनुसार भोजन"  हेच वचन या मार्गाचे तत्व आहे. बाबांनी भगवत प्राप्ती करिता निष्काम कर्म योग साधण्याकरिता आणि मानवी जीवनात सफल होण्याकरिता बाबांनी चार तत्व दिले आहे. "परमात्मा एक", "मरे या जिये भगवत नाम पर", दुःख दारी दुर करते हुए उद्धार", "इच्छा अनुसार भोजन" असे चार तत्व बाबांनी सर्वांना आपल्या जिवनात पाळायला दिले आहे. 

    

       मानव हा जन्माला आला की तो आपल्या अल्प बुद्धि नुसार कार्य करतो परमेश्वराची ओळख नसते. मोह, माया, अहंकार त्या मानवाचा अंगी वाढत असतो. त्याला परमेश्वराचा ज्ञान नसतो. तो स्वतःला मोठा समजुन आपले चुकिचे कर्म करत असतो. तो आपल्या अहंकारात आपले चुकिचे कर्म करत राहतो. आणि त्याच वाईट कर्मात तो फसतो. आणि दुःखास पात्र होतो. आणि मग नाही ते उपचार करतो. आपण सुद्धा मार्गात येण्याआधी दुःखा मुळे कितीतरी नानाप्रकारचे उपचार केले. पण कुठेही समाधानी मिळाली नाही. शेवटी एकाच परमेश्वराचा मार्ग मिळतो आणि त्याच परमेश्वराला आराधना करतो. आणि मानवधर्म मार्गात येतो. बाबांनी प्रत्येक आत्म्यात परमात्मा दाखविला आहे. जिवन जगे पर्यंत परमेश्वराला मानावे लागते. मरन आले की शरीर मृत होऊन परमेश्वरात विलीन होतो. म्हणून आपण ज्यावेळी मार्गात येतो तेव्हा परमेश्वराला वचन देतो "मी मरिन किंवा जगिन जिवनात एकच भगवान बाबा हनुमानजीलाच मानिन". म्हणजेच "मरे या जिये भगवत नाम पर" आपले शरीर मृत होत पर्यंत आपल्याला भगवत कार्य करायचे आहे. आपल्या शरीरात जो आत्मा आहे तो परमेश्वराचा अंश आहे. परमेश्वराला समोर ठेवून आपले कार्य करत राहाले तर आपल्या मनातील मोह, माया, अहंकार नष्ट होतात. आणि परमेश्वराला दिलेला वचन जीवनात कधीही विसरू नये. आणि बाबांनी दिलेले चार तत्व, तीन शब्द व पाच नियम जिवनात रोज आपल्या आचरणात आणावे. तरच आपल्या अंगी असलेल्या मोह, माया व अहंकाराचा नाश होणार. आणि तत्व, शब्द व नियमाने वागले तर वाईट विचार नष्ट होतात. यालाच "मरे या जिये भगवत नाम पर" म्हटले आहे.


माझ्या लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना श्रमा मागतो. 


नमस्कार..!


( टिप:- हि पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )


सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार 

                   ( Social Media Platform)



🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎


                  ★ सेवक एकता परिवार ★

             ( Social Media Platform )


©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )

https://www.facebook.com/SevakEktaParivar/



©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )

https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1


©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )

https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q


©️ सेवक एकता परिवार ( Instagram )

https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/

Saturday, February 6, 2021

"चार तत्त्व" | १) "परमात्मा एक" यावरिल विचार नक्की वाचा.

 



       मार्गात येण्या आधी आपण कुठल्या ना कुठल्या दुःखामुळे त्रासलो होतो. कुणी शारीरिक तर कुणी मानसिक त्रासा मुळे तर कुणी वाईट व्यसनाने तर कुणी भुतबाधा व अंधश्रध्दा मुळे त्रासलो होतो. दुःख एवढे होते की आपण मरण्याचा वाटेला जात होतो. घरची परिस्थिती एवढी खराब आणि हालावली होती की खायला अन्न सुद्धा मिळत नव्हते. आणि दुःखा पासून आराम मिळावा याकरिता इकडे तिकडे धडपड करत होतो. तेव्हा आपल्याला कुणीही साथ देत नव्हते आणि आपल्याला मदतही करत नव्हते.

      आपण त्यावेळी अनेकात असल्यामुळे अनेकांना मानत होतो. आणि अनेक पुजापाठ करत होतो. दुःखामुळे अंधश्रद्धेचा मागे वळून वाट्टेल ते चुकिचे कर्म केले. तेव्हा आपल्याला आपल्या दुःखामुळे अनेकाने पैश्यांने लुटले. सांगेल त्याप्रमाणे वागत गेलो आणि आपले कर्म चुकत गेले. आपण अनेकांना पुजत गेलो. पण कुणीही आपले दुःख दुर केले नाही. तेव्हा एकच परमेश्वर कृपेचा मार्ग मिळाला. "परमात्मा एक" या मार्गावर असलेल्या सेवकांनी आपल्याला या मार्गाची माहिती दिली. आणि आपण या मार्गावर येण्याचा विचार करून मार्ग स्वीकारला. आणि मार्गात येताच आपले मोठ्यात मोठे, असाध्य रोग, दुःख एका श्रणात दुर झाले. तर त्या परमेश्वराची महान कृपा आणि जागृत शक्ती२४ तास चैतन्य मय शक्तीचा आपल्याला अनुभव मिळाला आणि आपण सुखी, समाधानी झालो. अशी महान कृपा प्राप्त करणारे आपल्या सर्व सेवकांचे सदगुर मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती करून आम्हा दुःखी कष्टी मानवाला या मार्गाचा परिचय करून दिला आणि आपले दुःख दुर केले. बाबांनी आपल्याला चार तत्व, तीन शब्द व पाच नियमाचे पालन करायला सांगितले आहे. या तत्व, शब्द व नियमाचे तंतोतंत पालन केल्याने आणि परमेश्वरावर विश्वास केल्याने आपले दुःख एका श्रणात शब्दावर परमेश्वर योग देऊन आपले दुःख दुर करतो.

  

        महानत्यागी बाबा जुमदेवजी एका परमेश्वराची प्राप्ती करत असताना परमेश्वराने बाबाला दर्शन दिले. परमेश्वराला निष्काम भावनेने मानवाला परमेश्वर प्रती जगविण्यासाठी कार्य करील असे वचन देऊन  "परमात्मा एक" व "मरे या जिये भगवत नाम पर" हे वचन दिले व यावर परमेश्वर बाबांवर प्रसन्न होऊन बाबांना दोन वचन दिले "दुःख दारी दुर करते हुये उद्धार" व इच्छा अनुसार भोजन" हेच वचन या मार्गाचे तत्व आहे. सर्व सेवकांना पण मार्गात येतांना वचनबद्ध केले आहे आणि रोज आपण भगवंताला वचन देतो. त्यावरच भगवत कृपा उपस्थित राहुन आपले कार्य घडवते. बाबांनी आत्म्यात "परमात्मा" दाखविला आहे म्हणून प्रत्येक आत्म्याचा आदर करायला सांगितले आहे. आपल्या कुटुंबात व सेवकात एकता कायम करायला सांगितले आहे. बाबांनी दिलेल्या चार तत्वात पहिला तत्व "परमात्मा एक" येतो आणि याचेच पालन आपल्याला आपल्या जिवनात रोज करायचे आहे. परमात्मा एक प्रत्येक आत्म्यात आहे त्यामुळे सर्वांचा आदर करून सत्य, मर्यादा व प्रेमाचे आचरण करून सर्वांशी आपले कार्य करावे. तरच परमात्मा आपल्या आत्म्यात २४ तास चैतन्य मय राहिल. आणि आपले कर्म योग्य राहिल.


     महानत्यागी बाबा जुमदेवजींनी अशा एका परमेश्वराचा शोध घेतला जी मानवाचे सर्व प्रकारची दुःखे दुर करू शकते. तेव्हा परमेश्वराने आकारात येऊन दर्शन दिले. 'तुज आहे तुजपाशी तरी तू भुललासी' या म्हणीप्रमाणे ते बाबांना म्हणाले, सेवक तू मुझे कहाँ देख रहा है। मै २४ घंटे तेरे पास हूँ। जिस पल छूट जाऊंगा, तेरा शरीर मृत हो जायेगा । तेव्हा बाबांनी विचार केला की, अशी कोणती वस्तू आहे ज्यामुळे मी जीवंत आहे. तेव्हा त्यांना 'आत्मा' ही वस्तू आठवली. मनुष्याचा आत्मा निघून गेल्यावर त्याचे शरीर मृत होते. शरीर हे नश्वर आहे. आत्मा हा अमर असून तो परमेश्वराचा अंश आहे. संपूर्ण प्राण्यांचा आत्मा मिळून एक परमात्मा' आहे. म्हणजेच परमात्म्याचा अंश प्रत्येक जीवात्म्यात आहे. हे बाबांनी ओळखले. म्हणून बाबांनी परमेश्वराला ‘परमात्मा एक' मानले ती आत्मज्योत आहे. जो आत्मा बाबांजवळ आहे तोच आत्मा इतरांजवळ आहे. म्हणजेच सर्व मानव समान आहेत असे बाबा समजतात. त्यामुळे ते कोणालाही आपल्या पायावर डोके ठेवू देत नाहीत. कारण एका आत्म्याच्या समोर दुसरा आत्मा झुकणे हा आत्म्याचा अनादर होतो म्हणजेच परमेश्वराचा अनादर होतो. आत्मा चोवीस तास चैतन्य मय शक्ती आहे.  ती शक्ती दिसत नसुन तिचे गुण दिसतात.


लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना श्रमा मागतो.


नमस्कार...!


( टिप:- पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )


सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार 

                   ( Social Media Platform)



🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎


             ★ सेवक एकता परिवार ★

             ( Social Media Platform )


©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )

https://www.facebook.com/SevakEktaParivar/



©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )

https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1


©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )

https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q


©️ सेवक एकता परिवार ( Instagram )

https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/

परमात्मा एक मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा.

  "परमात्मा एक" मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा.         !! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!       !! महानत्याग...