Friday, October 30, 2020

परमात्मा एक मानवधर्मात कोजागिरी कशाप्रकारे साजरी करतात


     "परमात्मा एक" मानवधर्मात कोजागिरी  

                कशाप्रकारे साजरी करतात.


          "परमात्मा एक" मानवधर्मात कोजागिरी  

                    कशाप्रकारे साजरी करतात.


          कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा, ही आश्विन पौर्णिमेला हा भारतीय धर्म संस्कृतीतील महत्वाचा दिवस मानला जातो. ही पौर्णिमा शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार कोजागरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान असते. कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. 
        

        खगोलशास्त्रदृष्ट्या या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते. या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. 
        

            कोजागिरी पौर्णिमा हा सण अनेकातील लोक फार मोठया उत्साहाने साजरा करतात. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा. अनेकातील लोक या दिवशी पूजा , दान करतात. अनेका मध्ये दुध आटवत चंद्राची किरण पडल्यानंतर रात्रीला दवबिंदू पडतो. त्याला चंद्र देवाने सोडलेले अमृत समजल्या जाते. परंतु आपल्या मानवधर्मा मध्ये चंद्र किरणांची किंवा अमृत रुपी पडलेला दवबिंदू याच काहीच महत्त्व नाही. असो हा आपला विषय नाही. मानवधर्मात कोजागिरी कशाप्रकारे साजरी करावी यावर बोलुयात.
      

          परमात्मा एक मानवधर्मात पूजापाठ  , जुने विचार मनात न बाळगता एकच परमेश्वर मानुन तत्व, शब्द व नियमाचे पालन करतात. आपण ह्या सणाला आपल्या मानवधर्मानुसार साजरा करत असतो. सेवक त्या दिवशी सेवकांना एकत्र बोलावून चर्चा बैठक घेत असते. ह्या दिवशी सर्व सेवक-सेविका एकत्र येतात. आपापले अनुभव सांगतात.
       

              मी काही जेष्ठ सेवकांकडुन ऐकले आहे की या दिवशी अनेकातील लोक कोजागिरी निमित्ताने सर्व एकत्रीत येऊन कोजागिरी कार्यक्रम करतात. तर काही सेवकांनी बाबांजवळ कोजागिरी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर एका सेवकाने म्हटले की माझ्या घरी गाई म्हशी आहेत आणि माझ्या दुधाचा व्यवसाय आहे तर माझ्या घरी चर्चा बैठक घेऊन सर्व सेवक एकत्रीत येऊन कोजागिरी कार्यक्रम करूया तेव्हा बाबांनी त्यांच्या शब्द ऐकून चर्चा बैठकीचा माध्यमातून सेवक एकत्रीत येऊन कोजागिरी कार्यक्रम करू शकता आणि बाबांनी सहमति दिली असावी. तेव्हापासून गटात, गावोगावी, परिसरातील मार्गदर्शक सेवकांचा सहकार्याने कोजागिरी करतात.
  
            त्याच प्रमाने प्रत्येक वर्षी कोजागिरी या दिवशी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर च्या अंतर्गत व सर्व सेवकांचा सहकार्याने ( मानव मंदिर ) सांस्कृतिक भवनात चर्चा बैठकीचा माध्यमातून कोजागिरी कार्यक्रम आयोजित करण्यात येते. त्यानंतर गटागटात, गावोगावी, परिसरात मार्गदर्शक सेवकांचा सहकार्याने कोजागिरी करण्यात येते. बाबांनी दिलेल्या चार तत्व, तीन शब्द व पाच नियमाचा आधारावर चर्चा सत्र घेण्यात येते. सेवकांचे अनुभव, मार्गदर्शकांचे बाबांचा शिकवणी प्रमाणे मार्गदर्शन केले जातात सर्व सेवक, सेविका, बालगोपाल या कोजागिरी निमित्ताने एकत्रित येतात आणि कोजागिरी कार्यक्रम साजरा करतात. 
   
              या कार्यक्रमात येणारे सेवक कोजागिरी कार्यक्रमाला जास्त महत्त्व न देता चर्चा बैठकीला महत्व देऊन कार्यक्रम करतात. बाबांचा आदेशानुसार तत्व, शब्द व नियमाचे पालन करून कार्यक्रम व्यवस्थित पार पाडतात .

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात 
सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य 
घेऊन येणारी ठरो! हीच आमची कामना 

कोजागिरी च्या निमित्ताने मिळाली बासुंदीची मेजवानी 
चर्चा बैठकीच्या माध्यमातून मिळाली मानवधर्माची माहिती

मंद प्रकाश चंद्राचा 
त्यात गोड स्वाद दुधाचा 
विश्वास वाढू द्या नात्याचा 
त्यात असूद्या गोडवा साखरेचा 
आपण व आपल्या परिवारास 
माझ्यातर्फे गोड गोड शुभेच्छा

नमस्कार...

माझ्या लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर, मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना श्रमा मागतो. 

🙏🏻परमात्मा एक सेवक🙏🏻

( टिप:- ही माहिती कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )


सोशल मीडिया प्रकाशन:- सेवक एकता परिवार


🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎
सौजन्य:- सेवक एकता परिवार
             ( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/

©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/

2 comments:

परमात्मा एक मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा.

  "परमात्मा एक" मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा.         !! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!       !! महानत्याग...