Tuesday, October 20, 2020

"मानवधर्म परिचय पुस्तक" :- "प्रस्तावना"

                "मानवधर्म परिचय पुस्तक"

                            "प्रस्तावना"




                            !! "प्रस्तावना" !!
     
           परमेश्वराने आकाश, पाताळ, वायू, अग्नी व  पाणी या पंच तत्वावर आधारित सृष्टी निर्माण करताना पृथ्वीची रचना केली. या पृथ्वीवर अनेक जीवजंतू, प्राणी आणि वनस्पती यांची निर्मिती केली. मानव हा प्राणी असून परमेश्वराने त्याला ओळखण्याकरिता बुद्धी दिली. जेणेकरून तो आपल्या बुद्धीचा वापर करून परमेश्वराला ओळखील त्याचबरोबर मोह, माया, अहंकार हे गुणही त्याच्यात निर्माण केले. मानव घडविताना परमेश्र्वरी  हेतू हाच होता की , तो आपल्या बुद्धीचा उपयोग करून मोह, माया व आकार यांना बाजूला ठेवून (विसरून) त्याचे लक्ष परमेश्वराकडे राहील व परमेश्वरी कृपा संपादन करून आपले मानवी जीवन सुखी करील.


           पृथ्वीच्या रचनेप्रमाणे आणि निरनिराळ्या वातावरणामुळे मानवाने पृथ्वीचे अनेक खंड निर्माण केले आहेत आणि या प्रत्येक खंडात अनेक राष्ट्र निर्माण झालेत. मानवाला परमेश्वराबद्दल जागविण्याकरिता अनेक महापुरुषांनी जन्म घेतला. ही सृष्टी सदोदित सत्य मानवाची राहावी म्हणून परमेश्वराने कालचक्र निर्माण केले. या कालचक्रात सत्ययुग, द्वापार युग, त्रेतायुग आणि कलियुग अशी चार युगांची रचना केली.

          सत्ययुगात सर्व देव जन्माला आलेत अशी म्हण आहे त्याप्रमाणे जे जे महापुरुष जन्माला आलेत त्यांनी परमेश्वराची आराधना करने परमेश्वरी सिद्धी प्राप्त केली आणि सिद्धीनुरूप त्यांनी आपआपल्या परीने धर्म निर्माण केलेत उदाहरणार्थ - हिंदू, इस्लाम, खिचन, बौद्ध, सनातन धर्म इत्यादी. आणि त्यांनी परमेश्वराला अगणित नावे दिलीत. जसे अल्ला, भगवान, येशू खिस्त, बुद्ध इत्यादी प्रत्येक धर्मात परमेश्वर हा एकच आहे असे सांगितले आहे हे इतिहासावरून आपण पाहतो, पण परमेश्वराची अगणित नावे असल्यामुळे मानव गोंधळतो व तो या सर्व नावानुरूप अगणित परमेश्वर आहे असे म्हणतो. हिंदुधर्मात तर छत्तीस कोटी देवदेवता आहेत असे म्हटले जाते परमेश्वर निराकार आहे. सत्य, नीती आणि आत्याच्या दृष्टीने अवलंबिलेली धर्मनीती हीच
परमेश्वर - प्राप्तीचे खरे गुण आहेत.

            पुढे कालांतराने मानवाने, महापुरुषांनी परमेश्वराची ओळख करून दिल्याप्रमाणे त्याची मूर्ती तयार केली. हिंदूंनी देवळे, मुसलमानानी मरिजद, ख्रिश्चनांनी गिरिजाघर आणि बुद्धांनी बुद्ध विहार बांधलेत आणि त्या ठिकाणी या मूर्तीची स्थापना करून तिला देव मानून 'मूर्तिपूजा' करावयास सुरुवात केली. परंतु हे महापुरुष परमेश्वर नव्हते तर त्याचे अनुयायी होते. त्यांनी मानवाला परमेश्वराबद्दल जागविण्याचे कार्य केले. मानव बुद्धिजीवी असून सुद्धा खरा परमेश्वर कोण व कुठे आहे हे तो ओळखू शकला नाही.

             धर्म निर्माण झाल्यावर काही देश 'धर्मवादी' देश म्हणून उदयास आलेत. त्यांतील काही एकधर्मी, काही बहुधर्मी तर काही 'धर्मनिरपेक्ष' देश म्हणूनही संबोधण्यात येतात. यांतील 'भारत' हा धर्मनिरपेक्ष देश मानला जातो.कारण या देशात निरनिराळ्या धर्माचे लोक राहतात. धर्माधर्मातील लोकांत रूढी, चालीरीती, अंधश्रद्धा आणि प्रत्येकाला त्याच्या धर्माबद्दल वाटणारा अभिमान यामुळे आपआपसात भाडण होऊ नये आणि देश एकसंघ राहावा हा त्यामागील मूळ हेतू होय. तसा भारत हा देश हिंदू' चा देश आहे.

            जसजसे युगपरिवर्तन होत गेले, तसतशी मानवाची वृत्ती बदलत गेली. आणि यातील काही लोकांनी सर्व धर्मात आपणच परमेश्वराचे खरे भक्त आहोत, खरे रक्षक आहोत, या भावनेने त्यांनी मूर्तिपूजा करून पूजाअर्चा सुरू केली. मानवाला जीवन कंठताना
बऱ्याच गोष्टींची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासू लागली म्हणून त्यांनी मानवाला जे कार्य जमेल त्याप्रमाणे त्यांनी काम करावे, उदाहरणार्थ, अन्न हवे म्हणून शेती करणे, वस्त्र हवे म्हणून कपडे तयार करणे, राहावयास घर तयार करणे इत्यादी अनेक प्रकारची कामे मानवांनी करायला सुरुवात केली. त्याप्रमाणे त्यांच्या कामधंद्यांवरून जाती निर्माण झाल्या आणि कामाच्या स्वरूपावरून त्यांनी जातींमध्ये उच्चनीचता असा भेदभाव सुरू केला. जे लोक परमेश्वराची पूजा करण्याचे कार्य करीत होते ते सर्वोत्तम मानू लागले. अशा रीतीने तो 'उच्चभ्रू समाज मानला गेला.

         परमेश्वराची खरी आराधना करणारे लोक दूर राहिले. परंतु परमेश्वराला प्राप्त करण्याच्या नावाखाली स्वतःला बुद्धिमान, परमेश्वराचे एक अंग म्हणून म्हणवून घेणारे संधिसाधू, ढोंगी असे काही लोक निर्माण झालेत व ते इतरांचा छळ करू लागले. त्यांनी मंत्र, तंत्र या विद्या हस्तगत करून लोकांच्या पिळवणुकीला सुरुवात केली. याप्रकारे संपूर्ण जगातील सर्व धर्मात अंधश्रद्धा निर्माण करण्यात आली. यामध्ये हिंदू हे अग्रेसर आहेत. अशा प्रकारे मानवाची सर्व दुःखे दूर करण्याचे अधिकार आम्हासच असून आम्हीच दुःख दूर करू शकतो असा गैरसमज इतर मानवांत निर्माण केल्या गेला.

            या सर्व युगांत जेव्हा जेव्हा अराजकता, अनीती, अनैतिकता, असत्य, दुराचार, अत्याचार, भ्रष्टाचार, स्वार्थीपणा, मोह, अहंकार या वृत्ती मानवांत भयंकर प्रमाणात वाढू लागल्या तेव्हा तेव्हा परमेश्वराने या गोष्टींचा नायनाट करण्याकरिता मानवाच्या रूपात जन्म घेतला आणि त्या गोष्टींबद्दल मानवांत जागृती निर्माण करून त्यांचा नाश केला. इतकेच नव्हे तर मानवाला परमेश्वरी गुणांबद्दल जागविले. आणि मानवाला मोक्ष कसा मिळेल याबद्दल त्यांनी शिकवण दिली.थोडक्यात आध्यात्मिक शक्ती नीती,सत्य,आल्याच्या दृष्टीने अवलंबिलेली धर्मनीती हीच खरी ‘परमेश्वरी कृपा' आहे हे शिकविण्याचे कार्य या महापुरुषांकडून घडविले. अशा प्रकारे प्रत्येक युगात कालपरत्वे सत्य, नीती टिकविण्यासाठी ‘परमेश्वराचा अंश' म्हणून महापुरुषांच्या रूपात परमेश्वराचा जन्म झालेला आहे.

              सध्या तीन युगे संपलेली असून चौथे युग म्हणजे कलियुग सुरू आहे. या युगाचा उत्तरार्ध सुरू आहे असे समजल्या जाते. या कलियुगात संपूर्ण जगात खूप मोठ्या प्रमाणात असत्य, अमर्यादा, अनैतिकता, भ्रष्टाचार, अत्याचार, अहंकार वाढत आहे. स्वार्थापायी
जन्मदात्या आईवडिलांची, पोटच्या गोळ्याची पिळवणूक होत आहे. गरज पडल्यास त्याची हत्या करण्यास न कचरणारे लोकही आहेत. धर्माच्या नावावर अनेक खोटे व्यवहार करणारे साधुसंत निर्माण झाले आहेत. ते तंत्र, मंत्र, मूर्तिपूजेला प्राधान्य देत आहेत. अंधश्रद्धा निर्माण करून गोरगरीब , दुःखीकष्टी जनतेला लुबाडणे सुरू आहे. मानवा मध्ये अहंकार निर्माण झाला आहे.

         भारत हा 'धर्मनिरपेक्ष' देश असला तरी या देशात धर्माच्या नावावर लोकांची पिळवणूक सुरू आहे . येथे मुख्यत्वेकरून हिंदुधर्माचे लोक जास्त राहतात. हिंदुधर्मात सुद्धा कामधंद्यावरून माणसांचे चार भेद निर्माण केले आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे ते चतुर्भेद आहेत. यात सुद्धा अनेक जाती निर्माण झालेल्या आहेत. या जातींमध्ये अनेक सत्पुरुष, संत, सद्गुरू निर्माण झाले आहेत आणि धर्माच्या नावावर परमेश्वराबद्दल जागृती निर्माण करण्याचे कार्य ते करीत आहेत. परंतु ते खऱ्या अर्थाने परमेश्वरी ओळख करून देत नाहीत असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण त्यांनी चालीरीतीप्रमाणे तंत्र, मंत्र, मूर्तिपूजा याच रूढी ठेवलेल्या आहेत आणि परमेश्वर यांतच आहे, असे ते सांगत असतात. अशा प्रकारे ते अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. यामुळे सत्याचा लोप होत असून मानवांत परमेश्वरी कृपेची खरी जागृती होताना दिसत नाही.

         मानव हा आपल्या बुद्धीचा वापर करून त्याच्यावर येणाऱ्या संकटांवर मात करण्याचा प्रयत्न करतो. बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम होऊन त्याला अनेक शारीरिक दुःख निर्माण होतात आणि ती दुःखे उपचाराने लवकर बरी झाली नाहीत तर तो मानसिक व आर्थिक दुःखाने पीडित होतो. सर्व प्रकारचे उपचार करूनही त्याला समाधान मिळत नाही तेव्हा तो निराश होतो. अशा वेळेस त्याला परमेश्वराची आठवण होते व तो परमेश्वराच्या प्राप्तीसाठी भटकत असतो. अशा वेळेस त्याचा गैरफायदा संधिसाधू लोक धर्माच्या नावावर घेतात. परंतु दुःख दूर करीत नाहीत अशा परिस्थितीत देशात किंबहुना जगात शांती निर्माण करण्याकरिता ‘सत्याचे रोप' परत लावावे असे परमेश्वराला वाटले
असावे. जेणेकरून मानवजागृती होऊन कालचक्राप्रमाणे कलियुगातून जग पुन्हा सत्ययुगात सत्य, नीतिमत्तेला धरून प्रवेश करील आणि म्हणून सत्य, नीती प्रस्थापित करण्याकरिता सत्यवादी, प्रेमळ, मोह, माया, अहंकारापासून अलिप्त राहणारी, परमेश्वराची खरी ओळख करून देणारी व्यक्ती, जिचा कर्तृत्वाने आणि मार्गदर्शनाने मानवांत परमेश्वराबद्दल जागृती निर्माण होईल आणि पुन्हा सत्ययुग निर्माण होईल, अशा एका निष्काम कार्य करणाऱ्या कर्मयोगी महापुरुषाची परमेश्वराने निर्मिती केली आहे. ती व्यक्ती मनुष्याला सत्य,मर्यादा, प्रेमाचे आचरण करण्याबद्दल निष्काम भावनेने सदोदित मार्गदर्शन करते. आणि एका परमेश्वराची निराकार आणि चैतन्यात ओळख करून देते. इतकेच नव्हे तर नुसत्या आपल्या मार्गदर्शनाने मानवांची अनेक दुःखे मग ती शारीरिक, मानसिक वा आर्थिक असो नष्ट करते. त्यांना रोगमुक्त करते. ते परमेश्वराची ओळख करून देताना सांगतात की, परमेश्वर हा 'एकच' आहे व तो प्रत्येकात विराजमान आहे. तो निराकार आहे. ती व्यक्ती नसून जागृत शक्ती आहे आणि ती मानवात चोवीस तास चैतन्य आहे. ती निर्जीव वस्तूंमध्ये नसून सजीव प्राण्यांच्या आत्यात आहे. परमेश्वर दिसत नसून त्याचे गुण दिसतात. म्हणून मूर्तिपूजा हे शुद्ध ढोंग आहे. मानवाने परमेश्वराला प्रिय असणारे सत्य, मर्यादा, प्रेमाचे आचरण करावे. त्यागाने कार्य घडवावे म्हणजे खरा मोक्ष मिळतो. मानवाने मानवासारखे वागावे ही शिकवण ते देत असतात. म्हणून त्यांनी 'मानवधर्म' स्थापन केला,
ज्याला जात-पात नाही. असे जे महापुरुष आहेत ते "महानत्यागी बाबा जुमदेवजी".

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर मी"भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना श्रमा मागतो.

नमस्कार...!

( टिप:- ही माहिती कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )

वरिल माहिती "मानवधर्म परिचय पुस्तक" ( मराठी ) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

सौजन्य:- सेवक एकता परिवार ( Facebook Page )
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर


🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎

सौजन्य:- सेवक एकता परिवार
             ( Social Media Platform )

©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/


©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1

©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q

©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/

No comments:

Post a Comment

परमात्मा एक मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा.

  "परमात्मा एक" मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा.         !! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!       !! महानत्याग...