Monday, August 22, 2022

"परमेश्वर" म्हणजे काय? परमेश्वर कशात आहे. नक्की वाचा व जास्तीत जास्त शेअर करा.


                   "परमेश्वर" म्हणजे काय? 

                         "परमेश्वर" कशात आहे.

हे "महानत्यागी बाबा जुमदेवजींनी" कशाप्रकारे सिद्ध करुन दिले.

ही माहिती नक्की वाचा व जास्तीत जास्त सेवकांपर्यंत शेअर करा.



         परमेश्वर म्हणजे श्रद्धा, परमेश्वर म्हणजे विश्वास सर्व सजीव प्राण्यांच्या आत्म्यामध्ये परमेश्वराचा अंश आहे. म्हणजेच परमेश्वर आपल्या आत्म्या मध्ये राहतो. सर्व आत्म्याचा अंश मिळून बनलेली जागृत शक्ती म्हणजेच परमेश्वर आहे. 


        बाबा जुमदेवजींनी बाबा हनुमानजीला विनंती केल्यावर प्रतिज्ञा केली की, मी आजपासून कोणत्याही देवाला मानणार नाही. बाबांनी प्रतिज्ञा केल्याप्रमाणे त्या शक्तीचे संशोधन करण्यास सुरुवात केली. त्यांनी हनुमानजीसमोर प्रश्न ठेवला की, "हे हनुमानजी, संसारमें ऐसी कौनसी शक्ती है, जो सैतानको एक पलमें निकाल सके। भूत किसे कहे और भगवान किसे कहे ! इसका स्पष्टीकरण हमें समझा दो ।" या वेळेस बाबा स्वतः निराकारमध्ये आले आणि परमेश्वररूपी (बाबा हनुमानजी) बाबांच्या मुखकमलातून असे शब्द निघाले की, "यह एकही परमेश्वर है, जिसने इस सृष्टिका निर्माण किया है। वह एक जागृत शक्ती है जो निराकार है। वह चोवीस घंटे चैतन्य है। 


       बाबांच्या मुखकमलातून असे उद्गार निघाले की, "मैं सबका एक भगवान हूँ। सेवक, तू मुझे कहाँ ढूँढ रहा है। मैं चोबीस घंटे तेरे पास हूँ । जो क्षण मैं तुझसे छुट जाऊँगा, तेरा शरीर मृत हो जायेगा।" तेव्हा बाबांना वाटले की, 'मैं' कितना पागल हूँ। भगवान मेरे पास होकर मैं उसे कितना लम्बा ढूँढ रहा हूँ।' हे सर्व शब्द बाबांच्या कानांवर पडत होते. ते देहभान विसरले होते तरी त्यांना ते समजत होते. काही वेळाने त्याच निराकार अवस्थेत असताना एका क्षणी त्यांच्याच  मुखकमलातून पुन्हा असे शब्द निघाले की, "सेवक मैं भगवान हूँ । तू मानव है। मैं जानता हूँ, मानव यह बेइमान है । उनमेंसे तू एक मानव है। भलेही तूने मुझे प्राप्त किया, मैं भगवान हूँ। मैं मानवपर कदापिही विश्वास नहीं करता।" हे शब्द बाबांच्या कानी पडले, तेव्हा ते निराकार अवस्थेतच विचारमग्न झाले. भगवंताने मला बेइमान म्हटले असे त्यांना सारखे वाटू लागले. त्यांनी खूप वेळ विचार केला आणि ते त्याचे उत्तर शोधू लागले. काही वेळाने त्यांना उत्तर सापडले की याचे उत्तर 'इमान' हेच आहे आणि इमान हाच भगवान आहे असे समजून त्यांनी भगवंताजवळ प्रतिज्ञा केली की, 'हे भगवन् मैं जीवनमें इमान रखूँगा और सत्य सेवा करूँगा' ऐसा आपको सत्य वचन देता है। यानंतर परत विचार केला की, चोवीस तास मानवाजवळ असणारी अशी कोणती शक्ती आहे जी नाहीशी झाल्यावर शरीर मृत होते? यावर विचार केला असता त्यांना 'आत्मा' ही शक्ती आठवली. म्हणून पुन्हा त्यांच्या मुखकमलातून असे शब्द निघाले की, "परमात्मा एक। मरे या जिये भगवत् नामपर । हे बाबांचे वचन होते जे त्यांनी एका परमेश्वराला दिले. पुन्हा थोड्या वेळाने बाबांच्याच मुखकमलातून असे शब्द बाहेर निघाले की, दुःखदारी दूर करते हुये उद्धार । इच्छा अनुसार भोजन। हे दोन वचन परमेश्वराने बाबांना दिले असे त्यांना वाटले. 


       बाबांनी या मार्गात एकच परमेश्वर मानला आहे. बाबा हनुमानजी हे महान्त्यागी बाबा जुमदेवजी यांचे गुरू आहेत. त्यांनीच बाबांना एका परमेश्वराची ओळख करून दिली. परंतु हनुमानजी हे या मार्गाचे परमेश्वर नाहीत. परमेश्वर ही व्यक्ती नसून चोवीस तास जागृत असणारी दैवी शक्ती आहे. ती निराकार आणि चैतन्यमय आहे. प्रत्येकाच्या आत्म्यात ती शक्ती विराजमान आहे. म्हणून प्रत्येक मानव हा चैतन्य आहे. या दैवी शक्तीला आकारात दाखविता येत नाही तर बाबांनी दिलेल्या तत्व, विश्वास आणि त्याग यामुळे ती आकारात दाखविता येते म्हणजेच त्याचे गुण दिसतात. 


        बाबा नेहमी सांगतात की भगवंत निर्जीव मध्ये वास करीत नाही तर तो सजीव वस्तूंमध्ये वास करतो. त्यामुळे त्याचा आत्मा हा चैतन्य असतो. परमेश्वराने बाबांना त्यांच्या आत्म्यात आपली ओळख करून दिली आहे. म्हणून बाबा हे प्रत्येक मानवाच्या आत्म्यात परमेश्वर पाहतात. जो चोवीसतास त्याचे जीवन चैतन्यमय बनवितो. म्हणून बाबा स्वतःचा आत्मा आणि दुसऱ्याचा आत्मा सारखाच आहे असे समजून कोणालाही आपल्या पाया पडू देत नाहीत कारण एका आम्यापुढे दुसरा आत्मा झुकेल. त्यामुळे आत्म्याचा अपमान होईल आणि पर्यायाने परमेश्वराचा अपमान होईल असे ते समजतात. कारण आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. हीच शिकवण त्यांनी मानवाला म्हणजेच (सेवकाला) दिली आहे. परमेश्वर हा इतरत्र कुठेही नसुन तो आपल्या आत्म्यातच आहे. आणि चोवीस तास वास करतो. हे आपल्या महानत्यागी बाबा जुमदेवजींनी सिद्ध करुन दाखविले आहे.   


नमस्कार...


( टिप:- हि माहिती कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )


वरिल माहिती मानवधर्म परिचय पुस्तिक मधील आहे.


सौजन्य :- सेवक एकता परिवार

परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर नागपूर


★ सेवक एकता परिवार ★

             ( Social Media Platform )


©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )

https://www.facebook.com/SevakEktaParivar/



©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )

https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1


©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )

https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q


©️ सेवक एकता परिवार ( Sharechat )

https://sharechat.com/profile/sevakektaparivar?d=n



©️ सेवक एकता परिवार ( Instagram )

https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/

Saturday, August 20, 2022

"मानवधर्म" म्हणजे काय? मानवधर्माचा खरा अर्थ नक्की वाचा व जास्तीत जास्त शेअर करा.

 


                   "मानवधर्म" म्हणजे काय?


          महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानवधर्माची स्थापना १९४९ साली फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात महाशिवरात्रीच्या पर्वावर केली. मानवधर्माचा मुख्य उद्देश मानवाने मानवासारखे वागावे हा आहे. या धर्माची शिकवण म्हणून मानवाला भगवत प्राप्तीसाठी, निष्काम कर्मयोग साधण्याकरिता, त्यांच्या आयुष्यात वागण्याकरिता बाबांनी चार तत्त्व, तीन शब्द आणि पाच नियम दिले आहेत. 


चार तत्व

१) परमात्मा एक

२) मरे या जिये भगवत् नामपर

३) दुःखदारी दूर करते हुये उद्धार

४) इच्छा अनुसार भोजन


तीन शब्द

१) सत्य बोलणे

२) मर्यादा पाळणे

३) प्रेमाने वागणे


पाच नियम

१) ध्येयाने एक भगवंत मानणे.

२) सत्य, मर्यादा व प्रेम सेवकांत तसेच कुटुंबात कायम करणे...

३) अनेक वाईट व्यसने बंद करणे.

(दारू, टॉनिक, सट्टा, जुवा, लॉटरी, कोंबड्याची काती, चोरी करणे,

• खोटे बोलणे, राग आणणे बंद करणे. स्त्रियांनी मुलांना आणि पतिदेवाला वाईट शब्दांत बोलू नये. याशिवाय मानव जीवन खाली आणणारे कोणतेही वाईट व्यसन बंद करणे.)

४) कुटुंबात व सेवकांत एकता कायम करणे.

५) मानव मंदिर सजविण्याकरिता दान देणे.

(आपले कुटुंब मर्यादित ठेवणे.)


      मानवाने भगवंताच्या चरणावर मरून त्याला उभे केले पाहिजे आणि त्याने सर्व कार्य भगवंताला समोर ठेवून केले तर तो नेहमी सुखी आणि समाधानी राहू शकतो.

      

         बाबांनी या मार्गात एकच परमेश्वर मानला आहे. बाबा हनुमानजी हे महान्त्यागी बाबा जुमदेवजी यांचे गुरू आहेत. त्यांनीच बाबांना एका परमेश्वराची ओळख करून दिली. परंतु बाबा हनुमानजी हे या मार्गाचे परमेश्वर नाहीत. परमेश्वर ही व्यक्ती नसून चोवीस तास जागृत असणारी दैवी शक्ती आहे. ती निराकार आणि चैतन्यमय आहे. प्रत्येकाच्या आत्म्यात ती शक्ती विराजमान आहे. म्हणून प्रत्येक मानव हा चैतन्य आहे. या दैवी शक्तीला आकारात दाखविता येत नाही तर बाबांनी दिलेल्या तत्त्व, विश्वास आणि त्याग यामुळे ती आकारात दाखविता येते म्हणजेच त्याचे गुण दिसतात. 


        वंशपरंपरेनुसार रूढिवादाप्रमाणे या मार्गाची दीक्षा घ्यायच्या अगोदर सर्व देव-देवतांचे विसर्जन करावे लागते. तेव्हाच परमेश्वर पाठीशी उभा राहतो. मूर्तिपूजा बंद करावी लागते, श्री संत तुलसीदासांनी म्हटले आहे की, पत्थर पूजे भगवान मिले तो मै पूजूँ पहार' या म्हणीप्रमाणे बाबा नेहमी सांगतात की भगवंत निर्जीव वस्तूमध्ये वास करीत नाही तर तो सजीव वस्तूंमध्ये वास करतो. त्यामुळे त्याचा आत्मा हा चैतन्य असतो. परमेश्वराने बाबांना त्यांच्या आत्म्यात आपली ओळख करून दिली आहे. म्हणून बाबा हे प्रत्येक मानवाच्या आत्म्यात परमेश्वर पाहतात. जो चोवीसतास त्याचे जीवन चैतन्यमय बनवितो. म्हणून बाबा स्वतःचा आत्मा आणि दुसऱ्याचा आत्मा सारखाच आहे असे समजून कोणालाही आपल्या पाया पडू देत नाहीत कारण एका आत्म्यापुढे दुसरा आत्मा झुकेल. त्यामुळे आत्म्याचा अपमान होईल आणि पर्यायाने परमेश्वराचा अपमान होईल असे ते समजतात. कारण आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. हीच शिकवण त्यांनी मानवाला (सेवकाला) दिली आहे. या मार्गातील सेवकाला कोणत्याही देवळात नमस्कार करता येत नाही. तसेच तांत्रिक मांत्रिक यांचाही उपचार करता येत नाही. किंबहुना या तांत्रिक मांत्रिकांचा इलाज या मार्गातील सेवकांवर चालत नाही. अनेक वाईट व्यसने बंद करावी लागतात. दारू पिणाऱ्याला घरात प्रवेश देता येत नाही. दारू पिणारा घरात आला तर त्या घरात दुःख निर्माण होते.


       मानवाने सर्वांबरोबर सत्य, मर्यादा आणि प्रेमाने वागले पाहिजे. त्याने त्याच्यातील मोह, माया आणि अहंकार नष्ट करायला पाहिजे. त्याने निष्काम भावनेने कार्य करावे. दुसऱ्याच्या स्वार्थात स्वतःचा स्वार्थ साधावा. आपल्या स्वार्थाकरिता दुसऱ्याचे नुकसान करू नये. 'अपनी अपनी करनी उतरो पार, बापबेटेका कौन विचार' या म्हणीप्रमाणे प्रत्येकाने आपले कर्तव्य करून त्याचे परिणाम आपणच भोगावे. वडिल मुलाकरिता किंवा मुलगा वडिलांकरिता, केलेल्या कार्याचे परिणाम भोगत नाही म्हणजे प्रत्येकाने स्वतःच्या बाबतीतच विचार करायला पाहिजे. प्रत्येक जण जसे कर्तव्य करतो तसेच त्याला फळ मिळते. प्रसंग पडल्यास कोणी कोणाला साथ देत नाही. म्हणून प्रत्येक मानवाने स्वावलंबी बनणे आवश्यक आहे. त्याने निष्काम सेवा करावयास हवी.


       'असेल माझा हरी तर देईल पलंगावरी' ही तुकाराम- महाराजांची म्हण या मार्गात खोटी ठरली आहे. येथे नुसता देव देव करून चालत नाही. देव मानवाला साहाय्य करीत नाही. आपल्या कर्तृत्वानुसार आपल्याला फळ मिळत असते. त्यामुळे कर्तृत्वच श्रेष्ठ मानल्या गेले आहे. स्वतः नुसते कर्तृत्व करावे पण त्याच्या फळाची आशा करू नये बाबांनी दिलेल्या तत्त्व, शब्द आणि नियमाप्रमाणे कर्तव्य केले तर त्याला परमेश्वर साथ देतो आणि त्याचे चांगलेच फळ त्याला चाखायला मिळते. म्हणून देव देव म्हणून नुसते भजन करू नये. त्यामुळे त्याला दैनंदिन गरजा पूर्ण करता येत नाहीत आणि त्याचे जीवनमान सुद्धा उंचावणार नाही.


      या मार्गाची दीक्षा घेताना दीक्षा घेणारा स्वतःच परमेश्वराची आराधना करतो आणि त्याचे गुण पाहतो. बाबा त्याला फक्त मार्गदर्शन करतात. दीक्षा घेणाऱ्याला स्वतःच आराधना करून स्वतःच परमेश्वराचे चमत्कार पाहावे लागतात. हा मार्ग स्वीकारल्यावर स्वतःच हवन करावे लागते. दुसऱ्या कोणालाही हवन करता येत नाही. या मार्गात परमेश्वराने सेवकांच्या भावना संपवलेल्या आहेत. सेवकाने जर एखाद्या दुःखी आणि कष्टी माणसाला तीर्थ करून दिले तर त्याचे दुःख क्षणातच दूर होते. मानव हा त्यागी असला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक सेवक कोणत्याही देव-देवतांपेक्षा कमी नाही. तसेच या मार्गातील प्रत्येक नारी कोणत्याही देवीपेक्षा श्रेष्ठ आहे.


       'आपल्यासारखे करिती तात्काळ, त्या काळवेळ न लागे' या म्हणीप्रमाणे बाबांनी प्रत्येक सेवकाला स्वावलंबी, निःस्वार्थ आणि त्यागी बनविले असून निष्काम सेवा करण्याचे धडे शिकविले आहेत. त्यागामुळे परमेश्वर लवकर प्राप्त होतो. म्हणून या मार्गातील प्रत्येक सेवक इतरांचे दुःख झटकन नाहीसे करतो.


       'मानव धर्म' या मार्गात फक्त दोन जाती आहेत. नर आणि नारी  याशिवाय या मार्गात दुसरी कोणतीही जात-पात नाही. यापूर्वी ज्या जाती निर्माण झाल्यात त्या जातींना येथे स्थान नाही. येथे फक्त एकच धर्म आहे आणि तो म्हणजे 'मानव धर्म. कारण परमेश्वराला हव्या असलेल्या सत्य, मर्यादा आणि प्रेमपूर्ण वागणूक यासाठी मानवाला कार्य करायचे आहे मर्यादित कुटुंब, व्यसनमुक्ती, शुद्ध मन, स्वच्छ शरीर, शुद्ध वागणूक, स्वच्छ कपडे, साधी राहणी, उदात्त विचार आणि त्यागमय जीवन इत्यादी गोष्टी या मार्गाची शिकवण आहे.


       तत्त्व, निश्चय आणि त्यागाने परमेश्वर मानवाजवळ असतो. तत्त्वाने निष्काम कर्मयोग साधला जातो. निश्चयाने विश्वास वाढतो, तर त्यागाने धैर्य वाढते या मार्गात भावनेला मुळीच स्थान नाही.


        या मार्गाचे निशाण हे देशाचे 'निशाण' आहे. प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे की, त्याने ज्या भूमीवर जन्म घेतला असेल ती त्याची कर्मभूमी मानली पाहिजे आणि त्याबद्दल त्याला अभिमान असला पाहिजे. त्याकरिता तिचे रक्षण करणे हे त्याचे आद्य कर्तव्य आहे.

       

        'आपली सोडवणूक करावी आपणच' या म्हणीप्रमाणे या मार्गातील प्रत्येक सेवक त्याला येणाऱ्या दुःखापासून स्वतःला सोडवतो. मानव हा कार्य करणारा प्राणी आहे. तो कार्य करताना चुकतो आणि त्या चुकीमुळे त्याच्यावर दुःख येते. या दुःखातून मुक्त होण्याकरिता त्याला पुन्हा भगवंताजवळ आपली चूक कबूल करावी लागते. पुन्हा चूक करणार नाही असे वचन द्यावे लागते; कारण मानव हा क्षमेला पात्र आहे. वरील म्हणीप्रमाणे भगवंत त्याला क्षमा करून दुःखातून मुक्त करतो.


       या मार्गात असाध्य रोग, उदाहरण. टी.बी., कॅन्सर, कोड इत्यादी साध्य होतात. जे संसर्गजन्य रोग आहेत तेही या मार्गात नष्ट झालेले आहेत. तसेच वंशपरंपरागत रोगही नष्ट होऊन पुन्हा त्या कुटुंबात ते रोग होत नाहीत. याची अनेक उदाहरणे या मार्गातील सेवकांना आलेल्या अनुभवावरून आहेत.


नमस्कार...


( टिप :- ही माहिती कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )


वरिल माहिती मानवधर्म परिचय पुस्तिक ( मराठी ) पाचवी आवृत्ती मधील आहे.


सौजन्य :- सेवक एकता परिवार

परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर नागपूर


                  ★ सेवक एकता परिवार ★

             ( Social Media Platform )


©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )

https://www.facebook.com/SevakEktaParivar/



©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )

https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1


©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )

https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q


©️ सेवक एकता परिवार ( Sharechat )

https://sharechat.com/profile/sevakektaparivar?d=n



©️ सेवक एकता परिवार ( Instagram )

https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/

Monday, August 8, 2022

भगवत प्राप्ती प्रगट दिनानिमित्त षष्ठी हवनकार्य लवकरच १७ ऑगस्ट २०२२ | परमात्मा एक व्हाट्सअप स्टेट्स

 

Parmatma Ek WhatsApp Status


  ( १७ ऑगस्ट २०२२ एका भगवंताचे षष्टी हवनकार्य लवकरच स्टेट्स )


सेवकांकरिता नवनवीन व्हाट्स ॲप स्टेट्स बघण्यासाठी आपल्या या युट्यूब चैनल वर भेट देऊन YouTube Channel ला Subscribe नक्की करा.


स्टेट्स बघण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघावे.

युटयुब लिंक:- https://youtube.com/shorts/MierhFui2AY?feature=share








🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎


सौजन्य:-        ★सेवक एकता परिवार★
             ( Social Media Platform )

©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )

सेवक एकता परिवार ( Facebook Page )


©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
सेवक एकता परिवार ( Blog Spot )

©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
सेवक एकता परिवार ( YouTube Channel )

©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
सेवक एकता परिवार ( Instagram )



Sunday, August 7, 2022

महानत्यागी बाबा जुमदेवजींनी सेवकांना नमस्कार घ्यायला का सांगितले. ( नमस्काराचे काय महत्त्व आहे. )


महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी आपल्याला सर्व सेवकांशी नमस्कार घ्यायला का सांगितले आहे.

           ( नमस्काराचे काय महत्त्व आहे. )


                      



                    नमस्काराचे महत्त्व नक्की वाचा 


            मानवाने भगवंताच्या चरणावर मरुन त्याला उभे केले पाहिजे आणि त्याने सर्व कार्य भगवंताला समोर ठेवून केले तर तो नेहमी सुखी आणि समाधानी राहू शकतो. बाबांनी या मार्गात एकच परमेश्वर मानला आहे. बाबा हनुमानजी हे महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे गुरू आहेत. त्यांनीच बाबांना एका परमेश्वराची ओळख करून दिली परमेश्वर ही व्यक्ती नसुन चोवीस तास जागृत असणारी दैवी शक्ती आहे. ती निराकार आणि चैतन्यमय आहे. प्रत्येकाच्या आत्म्यात ती शक्ती विराजमान आहे. म्हणून प्रत्येक मानव हा चैतन्य आहे. या दैवीक शक्तीला आकारात दाखविता येत नाही. तर बाबांनी दिलेल्या तत्व, विश्वास आणि त्याग यामुळे ती आकारात दाखविता येते म्हणजेच त्याचे गुण दिसतात. 

     

          बाबा नेहमी सांगतात की भगवंत निर्जीव वस्तू मध्ये वास करित नाही. तर सजीव वस्तू मध्ये वास करतो. त्यामुळे त्याचा आत्मा हा चैतन्य असतो. परमेश्वराने बाबांना त्यांच्या आत्म्यात आपली ओळख करून दिली आहे. म्हणून बाबा हे प्रत्येक मानवाच्या आत्म्यात परमेश्वर पाहतात. जो चोविसतास त्याचे जीवन चैतन्यमय बनवितो. म्हणून बाबा स्वतः चा आत्मा आणि दुसर्याच्या आत्मा सारखाच आहे. असे समजून कोणालाही पाया पडू देत नाही. कारण एका आत्म्या पुढे दुसरा आत्मा झुकेल. त्यामुळे आत्म्याचा अपमान होईल. आणि पर्यायाने परमेश्वराचा अपमान होईल. असे ते समजतात. कारण आत्मा हा परमात्म्याच्या अंश आहे. हीच शिकवण बाबांनी मानवाला ( सेवकाला ) दिली आहे. 


          या मार्गातील सेवकाला कोणत्याही मंदिरात नमस्कार करता येत नाही.आपण अनेकात होतो तेव्हा आपण एकमेकांचा पाया पडत होतो. परंतु महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची ओळख करून देऊन आपल्याला एकमेकांचा पाया पडून प्रत्येक आत्म्याचा अनादर होत होता. त्यापासून बाबांनी आपल्याला एकमेकांना नमस्कार करायला सांगितले. आपण सेवकांना नमस्कार करून प्रत्येक आत्मरूपी भगवंताचा आदर करतो. नमस्कार म्हणजे नमन होय आपल्यापेक्षा लहान असो किंवा मोठे , गरिब असो किंवा श्रीमंत, शिक्षित असो किंवा अशिक्षित कसलाही भेद भाव न करता नमस्कार घेतो. कारण आत्मरुपी परमेश्वर प्रत्येकात आहे. म्हणून सर्व मानव समान आहेत. याप्रकारे नमस्कार घेतल्याने आपल्यातला अहंकार नाहीसा होण्यास मदत होते. 


        नमस्कार घेतल्याने आपल्या भारतीय संस्कृतीची सुद्धा ओळख होते. नमस्कार या शब्दात आपल्यातील एकतेची ओळख होत असते. एखाद्या व्यक्तीशी बोलायला सुरुवात जेव्हा आपण करतो तेव्हा आधी नमस्कार या शब्दाचा प्रथम वापर करून करतो. तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्या बद्दल काही गैरसमज असल्यास तो विसरून जातो. समोरच्या मनात आपल्या बद्दल प्रेमाची भावना निर्माण होत असते. आणि म्हणूनच म्हटले जाते की नमस्कार में ही चमत्कार है. नमस्कार म्हणजे मोठ्यांचा आशिर्वाद आहे. तिथे मानसन्मान दिला जातो. कारण नमस्कारत प्रेम आहे., नमस्कारात विनय आहे., नमस्कारात अनुशासन आहे., नमस्कार आदर शिकवतो., नमस्कारामुळे मनात सुविचार येतात., नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो., नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो., नमस्कारात शीतलता आहे., नमस्कारात आपण सेवक असल्याची ओळख होते.,


नमस्कार...


( टिप:- ही पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )




सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार 
                   ( Social Media Platform)


🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎


             ★ सेवक एकता परिवार ★
        ( Social Media Platform )


©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )

https://www.facebook.com/SevakEktaParivar/


©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )

https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1


©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )

https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q


©️ सेवक एकता परिवार ( Instagram )

https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/

१७ ऑगस्ट २०२२ षष्ठी हवनकार्य लवकरच | परमात्मा एक व्हाट्सअप फुल स्क्रीन स्टेट्स नक्की बघा.

 

Parmatma Ek WhatsApp Status


  ( १७ ऑगस्ट २०२२ एका भगवंताचे षष्टी हवनकार्य लवकरच स्टेट्स )


सेवकांकरिता नवनवीन व्हाट्स ॲप स्टेट्स बघण्यासाठी आपल्या या युट्यूब चैनल वर भेट देऊन YouTube Channel ला Subscribe नक्की करा.


स्टेट्स बघण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघावे.

युटयुब लिंक:- https://youtube.com/shorts/aYRTet4O31A?feature=share






🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎


सौजन्य:-        ★सेवक एकता परिवार★
             ( Social Media Platform )

©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )

सेवक एकता परिवार ( Facebook Page )


©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
सेवक एकता परिवार ( Blog Spot )

©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
सेवक एकता परिवार ( YouTube Channel )

©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
सेवक एकता परिवार ( Instagram )



परमात्मा एक मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा.

  "परमात्मा एक" मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा.         !! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!       !! महानत्याग...