"मानवधर्म" व "दिवाळी"
परमात्मा एक मानवधर्मातील सेवकांनी दिवाळी सण कशाप्रकारे साजरी करावी.
यावर विशेष माहिती
. "मानवधर्म" व "दिवाळी"
परमात्मा एक मानवधर्मात दिवाळी सण कशाप्रकारे साजरी करावा यावर विशेष माहिती
भारतीय संस्कृतीत दिवाळी हा सण सर्वात मोठा सण म्हणून साजरा करण्यात येतो. दीपावली किंवा दिवाळी म्हणजे "दिव्याचा उत्सव" हा एक प्राचीन हिंदू उत्सव आहे. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा आणि उज्वल उत्सव आहे. दिवाळी हा हिंदू धर्माचा मुख्य सण आहे. दिवाळी, दिव्यानंचा सण म्हणून साजरा केला जातो. दिवाळीला "दीपावली" म्हणूनही ओळखले जाते.अंधार दूर करुन प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. या दिवसांत सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर हा सण साधारणपणे ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान येत असतो. या सणाला भारतात बहुतांश ठिकाणी सुटी असते.
दिवाळी हा अनेकांतील सर्वात मोठा सण आहे. परंतु, मानव धर्मानुसार आपल्याला दिवाळीचे काहीच महत्व नाही. म्हणजेच आपल्या मानव धर्मात "दिवाळी" या सणाला काहीच महत्व नाही. मानव धर्मातील आपल्या सेवकांसाठी "षष्टीचे हवन" हा सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. कारण, राखीनंतर सहाव्या दिवशी "षष्टी" येत असते आणि महान त्यागी बाबा जुमदेवजींच्या आदेशानुसार आपण सर्व सेवक घरोघरी हवन घडवत असतो आणि एका परमेश्वराच्या प्राप्तीचा दिवस म्हणून प्रत्येक वर्षी "षष्टी" चा दिवस आपणास अतिशय महत्वाचा असतो. मानवधर्मातील सेवकांकरीता प्रत्येक दिवस हा दिवाळी सारखा आहे. कारण ४ तत्व, ३ शब्द आणि ५ नियमाने चालणारा सेवक हा नेहमी आनंदी असतो त्यामुळे त्या सेवकांच्या घरी नेहमीच दिवाळी असते. आपल्याला समाजात राहताना सामाजिक बांधिलकी जपावी लागते. त्यासाठी आपली इच्छा असेल तर आपणही आपल्या पध्दतीने दिवाळी साजरी करू शकतो.
आपण सर्व सेवक "षष्टी हवनाच्या" आधीच घरची साफ-सफाई करुन रंग रंगोटी केलेली असतेच त्यामुळे, आपल्याला दिवाळीत जास्त साफ-सफाई करण्याची गरज नसतेच. आपण सेवक घरासमोर रांगोळी काढू शकतो. बरेच सेवक इच्छेनुसार दिवाळीच्या दिवशी किंवा दिवाळीच्या दिवसात हवन घडवितात. आपल्याला हवन करायला कुठलेही बंधन नाही कारण, आपण हवन स्वइच्छेनुसार केंव्हाही करू शकतो परंतु, दिवाळीत अनेक जण पूजा अर्चना करत असतात म्हणून बरेच सेवक स्वईच्छेने कुठलीही भावना मनात न आणता घरी हवन घडवितात. आणि घराचे वातावरण प्रफुल्लित करतात. त्यादिवशी आपल्या परिसरातील सेवकांना हवणाला बोलावू शकतो. आपण सेवक अनेकांच्या घरी जाऊन फराळ घेत असतो. आपल्या सोयीनुसार जस जमेल तसे फराळ बनवून सेवकांना आमंत्रण देऊ शकतो. आपण सेवक सुंदर अंगनात रांगोळी काढून त्याचा आजूबाजूला दिवे लावू शकतो परंतु, त्यांची पूजा करू नये. भाऊबीजेला बहीण हि भावाला ओवाळू शकते. शक्यतो कमीत कमी ध्वनी, वायू प्रदूषण होईल इतकेच फटाके फोडावे. एक हर्षोल्हासाचा भाग म्हणून दिवाळी साजरी करावी.
दिवाळी जशी जवळजवळ येतात तर अनेकात आप आपल्या घरी लाईटिंग लावतात. तर आपण सुद्धा लावू शकतो. ज्या वेळी आपल्या घरी "षष्ठीचे हवनकार्य" राहते त्या आधी आपण घरची आपल्या घराची साफसफाई करून पेन्टींग करून लाईटिंग लाऊन सजावट करतो. कारण आपल्या मानवधर्म मार्गातील सर्वात मोठा सण आहे. अनेकात दिवाळीला आपल्या घरी दिवे आकाश कंदील लावून प्रकाश करतात. बाबांनी तर आपल्या जिवनातच प्रकाश केला आहे. कारण आपण अनेकात असतांना अंधारात होतो. आणि आपले दुःख सुद्धा दुर झाले नव्हते. पण ज्या वेळी मार्गात प्रवेश केला आपले दुःख दुर झाले. बाबांनी अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखविला. आणि आपले जिवन प्रकाशमय झाले. बाबांनी अशी २४ तास चैतन्य मय शक्ती आपल्याला दिली आहे. त्या शक्तीचा रोज अनुभव घेतो. शब्दरूपी परमेश्वरी कृपा आपल्या कडे आहे आणि बाबांनी सांगितल्या प्रमाणे सकाळी ०५ :३० ला भगवंताची ज्योत लावतो. आणि त्या ज्योती मध्ये परमेश्वर योग देऊन आपले कार्य सफल करतो. म्हणून आपण सेवक रोज प्रकाशमय आहो. आणि बाबांनी अंधारातून प्रकाशात आणले. त्या प्रकाशमय शक्तीचा अनुभव घेत असतो. आणि आपले कर्म तत्व, शब्द व नियमाचा आधारित करत असतो. आपण भगवंताला वचन दिले आहे. "भगवान बाबा हनुमानजी मी जिवनात केलेली सर्व जुनी पूजा, जुने विचार बंद केले. मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजीलाच मानीन. असे मी सत्य वचन देतो. याला जिवनात कधीही विसरणार नाही". असे वचन दिले. त्या प्रमाने आपण तत्व, शब्द व नियमाचे पालन करून आपले जिवन जगत असतो. कुठल्याही देवी देवतांची पूजा करू नये कारण, आपण कुठलेही जुने विचार बाळगू शकत नाही. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यावर सर्व सेवकांनी भर दिला पाहिजे आणि आपले बाबांचे आदेश आणि तत्व, शब्द आणि नियमांचा आधारावर चालावे. आपल्या करिता रोज दिवाळी आहे. कारण या मार्गातला सेवक अंधारातून प्रकाशात आलेला आहे.
नमस्कार...!
परमात्मा एक सेवक
( टिप:- ही माहिती कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )
सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार
( Social Media Platform)
🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎
★ सेवक एकता परिवार ★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/
🙏जी दादा छान विचार
ReplyDelete