Thursday, December 31, 2020

नुतनवर्षाभिनंदन" "विशेष लेख" हा लेख नक्की वाचा व आवडल्यास इतर सेवकांपर्यंत शेअर करा.

                  "नुतनवर्षाभिनंदन"

                      "विशेष लेख"


हा लेख नक्की वाचा व आवडल्यास इतर सेवकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.





.                       "नुतनवर्षाभिनंदन"
                            "विशेष लेख"      
    

      1 जानेवारी रोजी साजरा करण्यात येणारा नवीन वर्ष जगभरात उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी सर्व वर्गातील लोक त्यांच्या पद्धतीने साजरे करतात. नवीन वर्षाबद्दल खासकरुन तरुणांमध्ये खूप उत्साह असतो. त्याचबरोबर नवीन वर्षाला वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आणि पार्टी इत्यादींचे आयोजनही केले जाते.
     

      त्याच वेळी, बरेच लोक नवीन वर्ष नवीन काम सुरू करतात, त्यानंतर बरेच लोक येत्या वर्षात आपली उद्दीष्टे ठरवतात आणि पूर्वीपेक्षा स्वत: ला चांगले बनवण्याचा संकल्प करतात, तर काही लोक त्यांच्यातील वाईट गोष्टी दूर करण्याचा संकल्प करतात. नवीन वर्षाचा अर्थ प्रत्येकासाठी भिन्न आहेत.
      

          प्रत्येकजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत असतोच. नवीन वर्षात सर्वांना आशा आहे की येत्या वर्षात बरेच आनंद, उत्साह आणि उत्साह मिळेल. त्याच बरोबर, नवीन वर्ष अधिक खास करण्यासाठी, लोक आपल्या जवळच्या व्यक्ती, मित्र, नातेवाईक आणि शुभेच्छुकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात आणि त्यांना सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा देतात.
       

        त्याचप्रमाणे आपल्या मानवधर्मातील सेवक नवीन वर्ष साजरा सेवक सम्मेलनाचा माध्यमातून करतात. प्रत्येक वर्षी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर च्या अंतर्गत व हिंगणघाट शाखेच्या वतीने सर्व सेवकांचा सहकार्याने १ जानेवारी ला हिंगणघाट येथे मानवधर्माचे भव्य सेवक सम्मेलनाचे आयोजन केले जातात. या सेवक संमेलनात हजारोंच्या संख्येने सेवक- सैविका  शहरातून, गावातून सहभागी होऊन भगवत कार्याचा लाभ घेतात. मानवधर्माचा सेवकांकरिता नववर्ष सेवक सम्मेलन भगवत कार्यात उत्साहाने साजरा करतात. काही सेवक नववर्षाच्या निमित्ताने आपल्या घरी हवनकार्य घडवितात. तर काही सेवक परमपूज्य परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम येथे भेट देऊन नववर्षाची सुरुवात करतात. नवीन स्वप्न, नविन अपेक्षा, नवा ध्येय भगवंता समोर ठेवून आपल्या विनंत्या करून आपले नववर्ष सुख-शांती समृद्धी व आनंदाचे जावो. अशी परमेश्वराला विनंती करून आपले कर्म करतात.‌
   ‌ 
          २०२० वर्ष जगावर संकटाचे आले त्यामुळे मानवधर्माचे कुठलेही कार्यक्रम साजरे होऊ शकले नाही. मंडळा अंतर्गत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आम्हा सेवकांची शाळा मानवधर्माची चर्चासत्र रद्द करण्यात आले. आजही सर्व बंदच आहे. आम्हा सेवकांचा उत्साह , आनंद हा मानवधर्माचा होणार्या कार्यक्रमातुन सेवक सम्मेलनातून साजरा होत असतो. कारण आपल्या सेवकांकरिता रोज नवीन दिवस आहे आणि रोजच दिवाळी आहे आपण मार्गात येतांना सर्व जुने विचार,  जुनी पूजा सोडून नव्याने आपल्या जीवनाला सुरुवात करतो. मागे काय घडले ते वळून बघत नाही. तर पूढे काय करायचे याचा विचार करून परमेश्वराला समोर ठेवून आपले कर्म करत असतो. आपले जिवन अंधारातून प्रकाशाकडे आले. ज्या दिवशी आपण मार्गात प्रवेश केला तोच दिवस आपल्या करिता नवा दिवस नव जीवन आहे तेव्हा पासून आपले सर्व दिवस सुख, शांती, समाधानी व आनंदाचे जात आहे. भगवत कार्यात आपण नेहमी सहभागी होऊन आपले प्रत्येक दिवस आनंदाचे  व उत्साहाचे असतात.
      

      २०२१ येणारा नववर्ष सुख-शांती, समृद्धी व आनंदाचे जावो हीच परमेश्वराला विनंती आहे. आणि मागील वर्षी एकही कार्यक्रम पार पडले नाही. त्यामुळे आम्हा सेवकात निराशा व्यक्त झाली. येणार्या नववर्षात सर्व कार्यक्रम, सेवक सम्मेलन, चर्चा बैठक पून्हा सुरू व्हाव्यात अशी परमेश्वराला विनंती आहे. आपला आनंद उत्साह हा सेवक सम्मेलनातून चर्चा बैठकीतुन होत असतो. याची सर्व सेवकांना जानीव आहे. येणारा वर्षांचा पहिला कार्यक्रम २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी भव्य सेवक मेळावा मानवधर्म आश्रम मौदा येथे दर वर्षी उत्साहाने साजरा करण्यात येतो. लाखोंच्या संख्येने सेवक- सेविका उपस्थित राहुन भगवत कार्याचा लाभ घेतात. वनभोजन करून सेवकांसोबत भेटीगाठी होतात. त्यातच आमचा आनंद उत्साह आहे. सेवक सम्मेलन चर्चा बैठक यातच आम्हा सेवकांना सेवक शुभेच्छा देतात. या नववर्षात सर्व कार्यक्रम सुरू व्हावे अशी परमेश्वराला विनंती आहे. सर्व सेवक-सेविकांचे नववर्ष सुख-शांती समृद्धी व आनंदाचे जावो हीच परमेश्वराला विनंती आहे. नववर्षाच्या सर्व सेवक-सेविकांना  हार्दिक शुभेच्छा...

येवो समृद्धि तुमच्या अंगणी, 
वाढो आनंद सदा जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा, 
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!

नमस्कार...!

( टिप:- ही माहिती कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )

सौजन्य:-     ★ सेवक एकता परिवार ★     
              ( Facebook Page ADMIN )
        

🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎

सौजन्य:-        ★सेवक एकता परिवार★
                 ( Social Media Platform )

©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/

1 comment:

परमात्मा एक मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा.

  "परमात्मा एक" मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा.         !! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!       !! महानत्याग...