"परमात्मा एक" मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा.
!! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!
!! महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !!
!! परमात्मा एक !!
मानवधर्म मार्गात सेवकांनी दसरा कशाप्रकारे साजरा करावे ?
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी सांगितल्या प्रमाणे मार्गात सर्व जुनी पुजा व जुने विचार बंद करून यावे लागते. बाबांनी सर्व निर्जीव पुजा बंद करून सजिव पुजा सांगितले आहे. बाबांनी प्रत्येक आत्म्यात परमात्मा दाखविला आहे. बाबांनी दिलेल्या चार तत्व, तीन शब्द व पाच नियमाचा आधारावर सेवकांना चालावे लागते.
मानवधर्म मार्गात दसरा हा सण मुळातच नाही. बाबांनी कधीही गुरू दक्षिणा घेेतली नाही आणि पाया पडु दिले नाही. अनेकात औजार, गाडी, दुकान इत्यादि सामान धुवुन त्यांची पुजा करतात. पण मार्गातील सेवकांनी आपले औजार, गाडी , लोखंडी सामान त्या दिवशी न धुता केव्हाही धुन साफसफाई करू शकते. आपल्या मार्गात शेतकरी सेवक आहे. तर त्यांनी सुद्धा आपले शेतातील औजारे त्या दिवशी साफसफाई न करता केव्हाही करू शकता. आणि पुजा तर आपल्याला करताच येत नाही. कारण मार्गात निर्जीव पुजा बंद आहे. हार, अगरबत्ती लावतात ते सुद्धा चुकिचे आहे. तर सेवकांनी हे सर्व जुने विचार आणि पुजा करू नये.
कारण मार्गात असलेल्या सेवकांना बरेच शंका असतात नवीन सेवकाला तर याबाबत माहिती नसते काही जुने सेवक अजुन ही पूजा करतात. म्हणून नवीन व जुन्या सेवकांनी मंडळाचे "मानवधर्म परिचय पुस्तक" संपूर्ण वाचन केले तर प्रत्येक सेवकाला जाणीव होईल की मार्गात काय करावं लागते.काय करता येते.
सामाजिक परंपरेनुसार दसरा ह्या सणाला आपटयाची पाणे ( सोने) एकमेकांना देतात. दसरा ह्या सणाचे काही महत्व आहे. पहिले कारण दसरा ह्या दिवशी महाभारतातील पांडवाने आपटयाचया झाडा खाली आपले शस्त्रे ठेवलेली होते. त्या दिवशी ते काढून त्या शास्त्राचे साफसफाई करून आपटयाचया पाणे अर्पित केले होते. दुसरा कारण की ह्या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता. म्हणजेच असत्यावर सत्याचा विजय झाला होता. त्यामुळे ही जुनी परंपरा अजुनही सुरू आहे आणि ह्या दिवशी दसरा हा सण खुप जल्लोषात साजरा केला जातो. आपल्या वडिलधारी लोकांना एक प्रेमाचे प्रतीक म्हणून आपटयाचे पाणे ( सोने ) देतात. आणि भारतीय संस्कृतिचा आदर्श म्हणून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात.
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी आपल्याला ही सर्व जुने विचारातील परंपरा बंद केली आहे. पण बाबांनी अशी कुठलीही भेटवस्तू स्वीकार केली नाही. सेवकांनी दिलेला आपटयाचे पाण त्या सेवकाचा अपमान होऊ नये म्हणून स्वीकारले. तेव्हा बाबांनी सांगितले द्यायचे आहे तर तत्व, शब्द व नियमाचे पालन करून सत्य, मर्यादा व प्रेमाचे आचरण द्या. मार्गात असलेल्या सेवकांनी दसरा ह्या सणाला भगवंताला व बाबांना आपटयाचे पाण ( सोने ) द्यायची इच्छा असेल तर पाटावर एक सोन ठेऊ शकता. आपल्या मार्गात सेवकांनी सेवकाला सोने देऊन नमस्कार करावे कुणालाही पाया पडु देऊ नये.
मानवधर्म मार्गाचा शिकवणी प्रमाणे सेवकांनी कुठलेही जुने विचार, मनात जुनी भावना निर्माण करू नये. आणि कुठल्याही निर्जीव वस्तुची पुजापाठ करू नये. बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द व नियमाचे पालन करूण सर्व जूने विचार बंद करावे आणि दसरा हा सण आपल्या मानवधर्म मार्गात नाही हे विचार ठेवून सामाजिक परंपरेनुसार आपटयाचे पाणे आपल्या परिवारात, सेवकात देउन नमस्कार करून मानवधर्म मार्गाला महत्व द्यावे.
नमस्कार...
माझ्या लिहिण्यात काही चुकल्यास मी भगवान"बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना श्रमा मागतो.
🙏🏻परमात्मा एक सेवक 🙏🏻
( टिप:- ही माहिती कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )
🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या🌍
सोशल मीडिया प्रकाशन:- सेवक एकता परिवार
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/