Saturday, September 30, 2023

३ ऑक्टोंबर "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांच्या पुण्यतिथी निमित्त विशेष लेख नक्की वाचा

[ "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांच्या पुण्यतिथी निमित्त विशेष लेख ]

             !! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!

           !! महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !!

                            !! परमात्मा एक !!


[ "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांच्या पुण्यतिथी निमित्त विशेष लेख ]


"महानत्यागी बाबा जुमदेवजींनी एका भगवंताची प्राप्ती करुन परमेश्वरी कृपा दुखी कष्टी लोकांना निष्काम व निस्वार्थ भावनेने वाटून दिली. अशा कृपेची संपूर्ण माहिती.


        भारतीय संस्कृतीमध्ये मानवाला परमेश्वराबद्दल जागविण्याकरिता अनेक महापरूषांनी जन्म घेतला. ही सृष्टी सदोदित सत्य मानवाची राहावी म्हणून परमेश्वराने कालचक्र निर्माण केले. या कालचक्रात सत्ययुग, द्वापार युग, त्रेतायुग आणि कलीयुग अशी चार युगांची रचना केली. या सर्व युगामध्ये जेव्हा जेव्हा अराजकता, अनिती, अनैतिकता, असत्य, दुराचार, अत्याचार, भ्रष्टाचार, स्वार्थीपणा, मोह, माया, अहंकार या वृत्ती मानवांत भयंकर प्रमाणात वाढु लागल्या तेव्हा तेव्हा परमेश्वराने या गोष्टीचा नायनाट करण्याकरिता मानवाच्या रूपात जन्म घेतला आणि त्या गोष्टीबद्दल मानवांत जागृती निर्माण करून त्याचा नाश केला. इतकेच नव्हे तर मानवाला परमेश्वरी गुणांबद्दल जागविले आणि मानवाला मोक्ष कसा मिळेल याबद्दल त्यांनी शिकवण दिली. थोडक्यात आध्यात्मिक शक्ती, नीती, सत्य, आत्माच्या दृष्टीने अवलंबिले. धर्मनीती हीच खरी परमेश्वरी कृपा आहे हे शिकविण्याचे कार्य या महापुरूषांकडून घडविले. अशाप्रकारे प्रत्येक युगात कालपरत्वे सत्यनिती टिकविण्यासाठी परमेश्वराचा अंश म्हणून महापुरूषांच्या रूपात परमेश्वराचा जन्म झालेला आहे.


        अशा एका निष्काम कार्य करण्याऱ्या कर्मयोगी महान त्यागी बाबा जुमदेवजी महापुरूषाचा महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर शहरातील गोळीबार चौक जवळील टिमकी या परिसरात  वास्तव्यास असलेल्या श्री. विठोबाजी राखडू ठुब्रिकर आणि सौ.सरस्वतीबाई या दांपत्याच्या पोटी ३ एप्रिल १९२१ रोजी जन्माला आले.


         या दांपत्याचे बाबा हे चौथे अपत्य आहे. बाबांपेक्षा मोठे तीन भाऊ बाळकृष्ण, नारायण व जागोबाजी असे हे तीन मोठे भाऊ होते. तर एक भाऊ मारोती हा सर्वात लहान होता. अशी पाच अपत्ये या दांपत्याला होती. बाबांचे लहान पणचे नाव "जुम्मन" असे होते. घरची परिस्थिती हलाखीची आणि एकत्रित कुटुंब यामुळे बाबांचे शिक्षण मराठी चौथ्या कक्षा पर्यंत झाले. खर्च जास्त आणि आमदनी कमी यामुळे बाबांनी पुढील शिक्षण मध्येच सोडून घरच्या परिस्थितीला हातभार लावण्याचे ठरवून त्यांनी अगदी वयाच्या बाराव्या वर्षी वाडवडिलांच्या चालत आलेल्या "विणकरी" च्या कामाला सुरुवात केली. 


          लहानपणापासून बाबांचा उमदा स्वभाव होता. चेहऱ्यावर तेज होते. सौष्ठ देहदृष्टी होती. लहानपणापासून त्यांच्यात कणखरपणा आहे. ते लहानपणापासून नीतिमत्ता बाळगतात. ते दयाळू स्वभावाचे असून परमेश्वरावर त्यांचा बालपणापासूनच विश्वास आहे. त्यांना लहानपणी हनुमान चालीसा वाचण्याचा छंद होता. ते रोज संध्याकाळी हनुमान चालीसा वाचत असत. त्याचप्रमाणे बाबांना आपल्या बालपणी आखाड्यात जाण्याचा छंद होता.  बाबांचे लग्न त्यांच्या वयाच्या सतराव्या वर्षी म्हणजे १९३८ साली में महिण्यात नागपूर जिल्ह्यातील खापा गावातील प्रतिष्ठित निवासी श्री. बापुजी बुरडे यांची सुकन्या आणि तडफदार व अग्रगण्य विणकर नेते श्री. सोमाजी बुरडे यांची धाकटी बहिण वाराणसीबाई यांच्या बरोबर झाले.


     त्यांनी २५ ऑगष्ट १९४८ सृष्टीनिर्मात्या एका भगवंताची प्राप्ती केली आणि त्या परमेश्वरी कृपेचा परीचय समाजातील सर्व दुःखी कष्टी, गोरगरीब, जनतेला विनामुल्य करून दिला. त्यांनी परमेश्वराची ओळख करून देताना सांगितले कि, परमेश्वर हा एकच आहे व तो प्रत्येकात विराजमान आहे. तो निराकार आहे. ती व्यक्ती नसून जागृत शक्ती आहे. तो मानवता चोविस तास चैतन्य आहे. ती निर्जिव वस्तुमध्ये नसून सजीव प्राण्यांच्या आत्मात आहे. परमेश्वर दिसत नसून त्याचे गुण दिसतात. मानवाने परमेश्वराला प्रिय असणारे सत्य, मर्यादा, प्रेमाचे आचरण करावे, त्यागाने कार्य घडवावे म्हणजे खरा मोक्ष मिळतो. "मानवाने मानवासारखे वागावे, सत्य यही भगवान है" ही शिकवण त्यांनी दिली. अशाप्रकारे मानवाला परमेश्वराबद्दल जागविण्याकरिता त्यांनी १९४९ साली फेब्रुवारी महिन्यात "मानव धर्माची' स्थापना केली.


       परमेश्वराला हव्या असलेल्या सत्य, मर्यादा, आणि प्रेमपूर्ण वागणूक यासाठी मानवाला कार्य करायचे आहेत, मर्यादित कुटुंब, वाईट व्यसनमुक्ती, शुध्द मन, स्वच्छ कपडे, साधी राहणी, उदात्त विचार आणि त्यागमय जीवन इ. गोष्टी या मानव धर्माची शिकवण आहे.


        या मानव धर्माची स्थापना केल्यानंतर महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी दुःखी कष्टी मानवाला एका भगवंताचा परिचय करून देण्याकरिता खेडोपाडी, बैलगाडीने, पाई दौरा करून कशाचीही पर्वा न करता मानवजागृतीचे कार्य निष्काम भावनेने केले. बाबांनी भगवत प्राप्ती करिता निष्काम कर्म योग साधण्याकरिता बाबांनी चार तत्व दिले व आपली घरगृहस्थी उंच आणण्याकरिता पाच नियम दिले व सेवकात व कुटूंबात एकता कायम राहावी याकरिता तीन शब्द दिले. या चार तत्व, तीन शब्द व पाच नियमाचा आधारावर मार्गात येणारा सेवक आपले जिवन सुखमय जगु शकतो. बाबांनी सृष्टी निर्मात्या एका परमेश्वराची कृपा संपादन करून सुध्दा कधीही कोणालाही आपल्या पाया पडू दिले नाही किंवा कोणाकडून एक पैसा किंवा कुठलीही भेटवस्तु स्विकारली नाही तर त्यांनी निष्काम भावनेने लोकांची सेवा केली. कारण 'मानवाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा' असे त्यांचे मानने होते. बाबांनी प्राणातप्राण असेपर्यन्त सत्य, मर्यादा प्रेमाचे आचरण करून तिच शिक्षा आपल्या सेवकांना दिली.


          वाराणसी आईने आपले आयुष्य बाबांना देऊन स्वतः या पृथ्वीतलावरुन निरोप घेतला. कारण बाबांचे आयुष्य संपल्याची प्रचिती बाबांना झालेली होती. बाबांनी आपले पूर्ण आयुष्य फक्त या परमेश्वरी कृपेचा लाभ अनेकांना होण्यासाठी मार्गदर्शन करीत होते. अनेक सेवकांच्या चुकिच्या वागण्यामुळे बाबांवर दु:ख आले. आणि बाबा ३ ऑक्टोंबर १९९६ साली परमेश्वरात विलीन झाले.


     महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी केलेल्या महान कार्याची दखल घेवून भारत सरकारने त्यांच्या नावे दि. ३०/९/२०१३ ला 'टपाल खात्याचे टिकीट' काढून त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी स्थापन केलेल्या 'परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूर' ला महाराष्ट्र शासनातर्फे 'महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार' बहाल करण्यात आला.


       अशा प्रकारे निष्काम कर्मयोगी महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी दु:खी कष्टी गोर-गरिब मानवाला जगविण्याचे एका भगवंताच्या मानवाला परिचय करून देण्याचे कार्य सुरू केले होते. तेच कार्य बाबांनी मानव धर्माचे प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने ४ डिसेंबर १९६९ ला परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळाची स्थापना केली. मंडळाचे कार्य अहोरात्र सुरू असून बाबांचा संदेश, उपदेश दुःखी, कष्टी व गोरगरीब जनतेपर्यनत पोहचवून त्यांना सत्याप्रती जागवून महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी सुरू केलेल्या सत्ययुगाचा रथ पुढे नेत आहेत.


       अशा या कलियुगात सत्याचे बीज पेरणारे, सत्य मर्यादा प्रेमाचे जनक, मानवधर्म व परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक, निष्काम कर्मयोगी भारताचे आदर्श महामानव, थोर समाज सुधारक "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांचा दरवर्षी ३ ऑक्टोंबर ला  परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर नागपूर अंतर्गत पुण्यतिथी कार्यक्रम सांस्कृतिक भवन ( मानव मंदिर ) येथे आयोजित करण्यात येतात.


             ! भगवान बाबा हनुमानजी की जय !

          !! महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय !!

                      !!! परमात्मा एक !!!

            सत्य, मर्यादा व प्रेम कायम करनेवाले

             अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले

                     मानव धर्म की जय !


नमस्कार...


लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर, मी भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना श्रमा मागतो. 


परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर


( टिप:- ही पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )


सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार 

                   ( Social Media Platform)


🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎


             ★ सेवक एकता परिवार ★

             ( Social Media Platform )


©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )

https://www.facebook.com/SevakEktaParivar/


©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )

https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1


©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )

https://www.youtube.com/@Sevak_Ekta_Parivar


©️ सेवक एकता परिवार ( Instagram )

https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/


©️सेवक एकता परिवार

( Instagram Thread Channel ) 

https://www.threads.net/@sevak_ekta_parivar


©️ सेवक एकता परिवार 

( Share Chat )

https://sharechat.com/profile/sevakektaparivar?d=n



©️सेवक एकता परिवार

( WhatsApp Channel ) 

https://whatsapp.com/channel/0029VaA6U3MGZNCyrXLAEH0D

Monday, September 4, 2023

भगवतप्राप्ती प्रगटदिन व षष्टी हवनकार्य निमित्ताने "विशेष लेख" | "षष्टीच्या हवनकार्याचे महत्त्व" नक्की वाचा


 

"षष्टीच्या हवनकार्याचे महत्त्व"

                          "एका भगवंताची प्राप्ति"


          महानत्यागी बाबा जुमदेवजींनी बाबा हनुमानजीला विनंती केल्यावर प्रतिज्ञा केली की, मी आजपासून कोणत्याही देवाला मानणार नाही. हे सांगीतल्यावर बाबांनी त्या शिंपी समाजाच्या बाईचे संपूर्ण दुःख दुर केले. त्यानंतर बाबांनी या शक्तिचा विचार केला की, ही कोणती शक्ती असावी की जिच्यामुळे बाबा हनुमानजीच्या मंत्रोच्चाराने त्या बाईचे दुःख दुर झाले परंतु जे त्याच मंत्राने प्रतिज्ञाच्या अगोदर झाले नाही.


           बाबांनी प्रतिज्ञा केल्याप्रमाणे त्या शक्तीचे संशोधन करण्यास सुरुवात केली. त्यांनी हनुमानजीसमोर प्रश्न ठेवला की, "हे हनुमानजी, संसार में ऐसी कोणसी शक्ती है, जो सैतानको एक पलमें निकाल सके। भूत किसे कहे और भगवान किसे कहे इसका स्पष्टीकरण हमे समझा दो"। या वेळेस बाबा स्वतः निराकारमधे आले आणि शब्द परमेश्वररूपी (बाबा हनुमानजी) बाबांच्या मुखकमलातून असे शब्द निघाले की, "यह एकही परमेश्वर है, जिसने इस सृष्टीका निर्माण किया है। वह एक जागृत शक्ती है जो निराकार है। यह चौवीस घंटे चैतन्य है उसे प्राप्त करने के लिये पाच दिन हवन करना पड़ेगा"। त्यानंतर थोड्या वेळाने बाबा त्या निराकार अवस्थेतच घरच्या मंडळींना उद्देशून म्हणाले की, "परिवारके लोग सुनो, हम कलसे पाच दिन हवन करेंगे"।


            ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून बाबांनी पाच हवनांना रोज एक याप्रमाणे सायंकाळी सुरुवात केली. हा दिवस श्रावण वद्य प्रतिपदा होता व तो वार शुक्रवार होता. त्या दिवसाची तारीख २० ऑगस्ट १९४८ होती. पाचव्या दिवशी हवन संपताक्षणीच बाबांचे ब्रम्हांड चढले ते देहभान विसरले आणि निराकार अवस्थेत आले. त्या अवस्थेत ते खुप आकांत करून रडू लागले. तेव्हा घरातील सर्व मंडळी हजर होती. त्या निराकार अवस्थेत बाबांच्या मुखकमलातून शब्द बाहेर पडले की, में कहाँ आ गया हूँ। असे म्हणून पुन्हा जोरजोरात आकांत करून रडू लागले. घरच्या मंडळींना उद्देशून म्हणाले, "घरवाले सुनो, मैं कहाँ आ गया हूँ। सेवक भगवान बन गया"। हे ऐकून आणि बाबांना रडतांना बघून घरची मंडळी घाबरली व त्यांना 'बाबा चूप हो जाओ' असे विनवू लागली. परंतु बाबा निराकार अवस्थेत असल्यामुळे त्यांना काहीच कळत नव्हते, मैं कहा आ गया हूँ। असे म्हणत बाबा सारखे एक ते दीड तासपर्यंत आकांत करून रडत होते. त्यानंतर ते शांत झाले. निराकार अवस्थेतून ते देहभान अवस्थेत आले. त्यानंतर त्यांनी जेवण घेतले आणि आराम केला. परंतु ते गुंगीतच होते.


             दुसऱ्या दिवशी म्हणजे सहाव्या दिवशी श्रावण वद्य षष्टी होती. त्या दिवशी १९४८ सालच्या ऑगस्ट महिन्याची २५ तारीख असून बुधवार दिवस होता. या दिवशी बाबा गुंगीतच असल्यामुळे हवनाची समाप्ती म्हणून घरच्या लोकांनी हवन केले. हवन संपल्याबरोबर पुन्हा बाबांचे अंग फिरू लागले. ते देहभान विसरले. त्यांचे ब्रम्हांड चढले आणि ते निराकार स्थितीत आले. काही वेळाने त्यांच्या मुखकमलातून शब्द बाहेर पडले की, या देशात जितकी दैवते मानतात, उदा. हिंदुधर्मातील राम, कृष्ण, शंकरजी, सर्व देवी, देवता, ब्रह्मा, विष्णू, महेश, दत्त सर्व अवलिया, उदा. गजानन महाराज, साईबाबा, त्याचप्रमाणे इतर धर्मातील दैवते जसे अल्ला, येशू ख्रिस्त, महावीर जैन, बुद्ध इत्यादी हे सर्वजण त्यांना एकानंतर एक येऊन दर्शन देत आहेत आणि मी अमुक आहे असे म्हणून आपआपला परिचय देत आहेत असे ते सारखे बडबडत होते. त्यानंतर जगातील सर्व देव त्यांच्या अंगात एकानंतर एक येऊन त्यांना आपआपला परिचय करून देऊ लागले. यांत शेषनागाने पण आपला परिचय दिला. ही क्रिया खूप वेळपर्यंत सुरू होती.


             ही संपूर्ण क्रिया पूर्ण झाल्यावर त्यांच्या अंगात शेवटी एक भगवान आलेत. त्यांनी आपला परिचय दिला. या वेळेस बाबांच्या मुखकामलातून असे उदगार निघाले की, "मैं सबका एक भगवान हूँ। सेवक, तू मुझे कहा ढूंढ रहा है। मैं चौबीस घंटे तेरे पास हूँ। जो क्षण मैं तुझसे छूट जाऊँगा, तेरा शरीर मृत हो जायेगा"।  तेव्हा बाबांना वाटले की, "मैं कितना पागल हूँ। भगवान मेरे पास होकर मैं उसे कितना लम्बा ढूढ़ रहा हूँ"। हे सर्व शब्द बाबांच्या कानावर पडत होते. ते देहभान विसरले होते तरी त्यांना ते समजत होते .


          काही वेळाने त्याच निराकार अवस्थेत असतांना एका क्षणी त्यांच्याच मुखकामलातून पुन्हा असे शब्द निघाले की , "सेवक मैं भगवान हूँ। तू मानव है । मैं जानता हूँ , मानव बेईमान है। उनमेसे तू एक मानव है। भलेही तूने मुझे प्राप्त किया , मैं भगवान हूँ। मैं मानवपर कदपि ही विश्वास नही करता'। हे शब्द बाबाच्या कानी पडले , तेव्हा ते निराकार अवस्थेतच विचारमग्न झाले. भगवंताने मला बेईमान म्हटले असे त्यांना सारखे वाटू लागले. त्यांनी खूप वेळ विचार केला आणि ते त्याचे उत्तर शोधू लागले . काही वेळाने त्यांना उत्तर सापडले की याचे उत्तर इमान हेच आहे आणि इमान हाच भगवान आहे असे समजून त्यांनी भगवंताजवळ प्रतिज्ञा केली की , "हे भगवान मैं जीवन में इमान रखूँगा और सत्य सेवा करूँगा ऐसा आपको सत्य वचन देता हूँ"। यानंतर परत विचार केला की, चोवीस तास मानवाजवळ असणारी अशी कोणती शक्ती आहे जी नाहीशी झाल्यावर शरीर मूत होते ? यावर विचार केला असता त्यांना आत्मा ही शक्ती आठवली . म्हणून पुन्हा असे शब्द निघाले की , "परमात्मा एक। मरे या जिये भगवंत नामपर"। हे बाबांचे वचन होते जे त्यांनी एका परमेश्वराला दिले . पुन्हा थोडा वेळाने बाबाचाच मुखकमलातून असे शब्द बाहेर निघाले की , "दु:खदारी  दूर करते हुये उद्धार। इच्छा अनुसार भोजन"। हे दोन वचन परमेश्वराने बाबांना दिले असे त्यांना वाटले .


            थोडा वेळ शांत राहून निराकार अवस्थेतच त्यांनी घरच्या मंडळीना उद्देशुन म्हटले की , "परिवार के लोग सुनो , इस परिवारके लोग सारी पूजा बंद करके एकही भगवान को माने।" असा आदेश त्यांनी दिला . त्यानंतर घरच्या मंडळींनी बाबांना आश्वासन दिले की , बाबा , आजसे हम एकही भगवान को मानेंगे । त्यानंतर बाबांची निराकार अवस्था ( ब्रम्हाड अवस्था ) संपली. पण ते निराकार अवस्थेतच होते. तेव्हापासून घरचे लोक एकाच भगवंताला मानू लागले. सर्व देवांची पूजा करणे त्यांनी बंद  केले. त्यांनी देवळात जाणे बंद केले. अशा प्रकारे बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केली . तो दिवस श्रावण वद्य षष्ठीचा असल्यामुळे प्रत्येक वर्षी त्या दिवशी सर्व सेवक एका भगवंताचा प्रगट दिन म्हणून आपआपल्या घरी हवनकार्य करुन तो दिवस साजरा करतात. याशिवाय मानव धर्माचा तो सर्वात मोठा सण आहे असे समजतात.


          या दिवसापासून बाबा जुमदेवजी यांना बाबा हनुमानजी यांनी खऱ्या अर्थाने एका परमेश्वराची ओळख करुन दिली. तेव्हापासून बाबा जुमदेवजी बाबा हनुमानजी यांना भगवंत न मानता आपले गुरु मानू लागले. सृष्टि निर्मात्या परमेश्वराचे प्रतिक म्हणून कसलीही खूण नाही. कोणत्याही धर्माप्रमाणे परमेश्वराचे काहीतरी प्रतिक असणे आवश्यक आहे. हिंदुधर्माप्रमाणे गुरुचीच पूजा करणे म्हणजे भगवंताची पुजा करणे होय असे समजतात. बाबा जुमदेवजी हे हिंदुधर्माचे असल्यामुळे त्यांनी आपले गुरु बाबा हनुमानजी यांचे प्रतिक एकच भगवान म्हणून लोकांपुढे ठेवले आहे. भगवंत व्यक्ति नसून ती चैतन्यशक्ति आहे. ती चोवीस तास जागृत असून निराकार आहे. बाबा हनुमानजी हे भगवंत नाही असे स्पष्ट केले. या मार्गात हवनाला महत्व आहे. परंतु मानवाचे लक्ष भगवंता कडे असावे म्हणून हवन करतांना किंवा दररोज पूजा करतांना बाबा हनुमानजींचे प्रतिक ठेवले आहे. जेणेकरून मानवाच्या मनात भगवंताविषयी जागृती निर्माण होईल आणि सदोदित मानव भगवंताचे मनन करील.


          बाबा हनुमानजींनी बाबा जुमदेवजींना अनेक देव देवतांची ओळख करुन दिली हे आपण वर पाहिले आहे. त्यांनी भगवंताला प्रिय असणारे कार्य केले आहे. म्हणून ते परमेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले आणि या जगातील भाबड़ी जनता त्यांना परमेश्वर मानून पूजा करू लागली. परंतु ते परमेश्वर नव्हते तर मानवच होते. म्हणून जनतेने त्यांच्यासारखेच कार्य करावे. त्यांना परमेश्वर म्हणून पूजू नये. कारण परमेश्वर हा एकच आहे, जो सृष्टिचा निर्माता आणि जगाचा विधाता आहे.


नमस्कार....


( टिप :-  वरिल माहिती "मानवधर्म परिचय पुस्तक" ( मराठी ) पाचवी आवृत्ती मधील आहे. ) 


सौजन्य:- सेवक एकता परिवार ( Facebook Page )

परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर


🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎


सौजन्य:- सेवक एकता परिवार

             ( Social Media Platform )


©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )

https://www.facebook.com/SevakEktaParivar/


©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )

https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1


©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )

https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q


©️ सेवक एकता परिवार ( Instagram )

https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/

Friday, September 1, 2023

मानव धर्माचा सर्वात मोठा सण भगवत प्राप्ती प्रगट दिनानिमित्त षष्ठीच्या हवनकार्याचे महत्त्व सर्वांनी आवर्जून नक्की बघा.

 

Parmatma Ek Manavdharm Mahiti


मानव धर्माचा सर्वात मोठा सण भगवत प्राप्ती प्रगट दिनानिमित्त एका भगवंताच्या प्राप्तीचे षष्ठीचे हवनकार्य षष्ठीच्या हवनकार्याचे महत्त्व

( भगवत प्राप्ती प्रगट दिनानिमित्त षष्ठीच्या हवनकार्याचे महत्त्व सर्वांनी आवर्जून नक्की बघा. )


मानवधर्मातील सेवकांकरिता मानवधर्माशी संबंधित व्हिडिओ, स्टेट्स पाहण्यासाठी आपल्या या युट्यूब चैनल वर भेट देऊन YouTube Channel ला Subscribe नक्की करा.


व्हिडिओ बघण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघावे.

युटयुब लिंक:- https://youtu.be/8o4aYent_zQ







🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎


सौजन्य:-        ★सेवक एकता परिवार★
             ( Social Media Platform )

©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )

सेवक एकता परिवार ( Facebook Page )


©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
सेवक एकता परिवार ( Blog Spot )

©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
सेवक एकता परिवार ( YouTube Channel )

©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
सेवक एकता परिवार ( Instagram )



परमात्मा एक मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा.

  "परमात्मा एक" मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा.         !! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!       !! महानत्याग...