मातोश्री वाराणसी आई यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
( मातोश्री वाराणसी आई यांच्या 31 जुलै पुण्यतिथी दिनानिमित्त विशेष लेख )
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानवाच्या हितासाठी, सुख-समाधानी साठी एक भगवंताची प्राप्ती करून मानवधर्म स्थापन केले आहे. या मानव धर्माचे आपण सेवक आहोत म्हणून आपल्याला बाबांनी केलेल्या भगवत् प्राप्तीच्या कार्यात बाबांना प्रत्येकदा सहकार्य, सहयोग करणाऱ्यांची आपल्याला माहिती असणे तसेच त्यांना जाणून घेणे अत्यावश्यक आहे.
आपले महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या अर्धांगिनी - धर्मपत्नी म्हणजे आमच्या सर्वांच्या मातोश्री वाराणशी आई ठुब्रीकर यांनी बाबांना पदोपदी, प्रत्येक वेळी, कठीण समयी परीपूर्ण साथ दिली आहे. बाबांना आईची साथ मिळाली नसती तर बाबांनी प्रपंचातून परमेश्वर साधला नसता.
सतयुगात जसे ब्रम्हा-सरस्वती, विष्णु-लक्ष्मी, शिव-पार्वती इत्यादि , त्रेतायुगात राम-सिता आणि द्वापारयुगात पाचपांडव-द्रोपदी. तसेच कलयुगात बाबा जुमदेवजी-आई वाराणशी.
अधर्मीयांचे नाश करून धर्म रक्षणासाठी सतयुगात दानवांचे- राक्षसी प्रवृत्तीच्या दैत्याचा नाईनाट करण्यासाठी ब्रम्हा, विष्णु, महेश यांना त्यांच्या पत्नी - अर्धांगिनीने वेगवे रूपात सहकार्य केले, त्रेतायुगात रामाला अधर्मी, अन्यायी, अत्याचारी रावणाचा वध करण्यासाठी सितेच्या सहकार्याने एक निमित्त मिळाले आणि रावणाचा वध करावे लागले. द्वापारयुगात द्रौपदीच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे निमित्त बनून सहकार्याने धर्म संस्थापनाचे कार्य करण्यासाठी श्रीकृष्णाच्या उपदेशाने अधर्मीयांना व त्यांना सहयोग करणाऱ्यांना युद्धात मारावे लागले. जेणेकरून धर्म टिकून राहायला पाहिजे.
युगानुयुगे धर्म स्थापन करण्यासाठी भगवंताला मानवाची गरज होती म्हणून मानव रूपात भगवंतानी जन्म घेऊनच मानवाला धर्म-कर्माची शिकवण देण्यासाठी निती-नियम बनवून स्वतः आचरणाने जीवन जगण्याचा ज्ञान देण्याचे कार्य भगवंतानी मानव जन्म घेऊन केलेले आहे.
या कलयुगात सुद्धा अधर्मी आचार - विचारानुसार कर्मभोगी मानवात धर्मांधता वाढत चालली असतांना अधर्मी, दुष्कर्मी, दुराचारी, व्यभिचारी, अन्यायी, अत्याचारी प्रवृत्ती जगात थैमान घालत आहे त्यामुळे धर्म नाहिसा होणार आणि संपूर्ण सृष्टिवर संकट निर्माण होईल असे भगवंताला वाटले असावे म्हणून भगवंतानी महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या रूपाने आम्हाला मानवधर्माची शिकवण दिली आहे.
श्रृष्टि मधे भगवंताने प्रत्येकाची जोडी बनविलेली आहे कारण कोणतेही कार्य, व्यवहार एकट्याने अशक्य आहे. म्हणूनच बाबांच्या अर्धांगिनी, आमच्या मातोश्री वाराणशी आईंनी बाबांच्या परमेश्वरी कृपा संपादन करण्याच्या कार्यात, बाबांच्या निराकार अवस्थेत तसेच विदेहावस्थेत सहयोग केले, बाबांना आईचे परीपूर्ण सहकार्य मिळाले, म्हणूनच बाबा एका भगवंताची प्राप्ती करण्यात यशस्वी झाले.
बाबांना आईंची पदोपदी, वेळोवेळी बाबांच्या खांद्याला खांदा लावून यथोचित साथ मिळाली नसती तर एक भगवंताच्या प्राप्तीनंतर बाबा संन्यासी जीवन जगत राहिले असते आणि आम्हाला आमच्या धर्माचे, भगवत् कृपेचे, सुख-समाधानी जीवन जगण्याचे ज्ञान बाबांच्या आदेश, संदेश, उपदेशा द्वारे कधीही मिळाले नसते. यावरून आमच्यासाठी मातोश्री वाराणसी आईंनी बाबांना सेवकाला प्रपंचातून परमेश्वरी कृपेचा लाभ मिळण्यासाठी निराकार आणि विदेहावस्थेतून मुक्त करण्याचे महान कार्य केलेले आहे.
मातोश्री एव्हढ्यावरच थांबल्या नाहीत तर जेंव्हा महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना भगवंतानी त्यांचे आयुष्य संपण्याची जाणीव करून दिले तेंव्हा आईंनी जगातील कोणत्याही धर्मात नाही असा हा मानव धर्म आहे हे सिद्ध करून देण्यासाठी तसेच सेवकांच्या हितार्थ मानवधर्माची शिकवण अधिक काळ सेवक सेविकांना मिळायला पाहिजे म्हणून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुमारे 15 वर्षाचे आपले आयुष्य बाबांना देण्याचे अविस्मरणीय त्यागाचे न भूतों न भविष्यती असे कार्य करून आपले त्यागमय जीवन सार्थकी केलेले आहे.
मातोश्री वाराणसी आई जुमदेवजी ठुब्रीकर यांनी आमच्यासाठी बाबांच्या सोबतीने केलेल्या त्यागासाठी आणि मानवाला भगवंता प्रती जागविण्याचे हितार्थ कार्यासाठी बाबांना निराकार आणि विदेहावस्थेतून मुक्त करण्याचे आणि आमच्यासाठी आपले आयुष्य बाबांना प्रदान करण्याचे महान कार्य केल्याबद्दल हार्दिक अभिनंदनासह आदरांजली अर्पण करून आपले विचार थांबवित आहे.
माझ्या लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार....!
✍🏻लेखन :- संतोष बोपचे
सुर्यटोला, गोंदिया
( टिप:- ही पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )
सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार
( Social Media Platform)
🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎
★ सेवक एकता परिवार ★
( Social Media Platform )
©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/
©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q
©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar